मुंबई l Mumbai :
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या डी-कंपनीवर (Underworld Don Dawood Ibrahim’s D Company) राष्ट्रीय तपास संस्थेनं (National Investigation Agency (NIA) मोठी कारवाई केली आहे.
मुंबईत आज (दि. 09) जवळपास 20 ठिकाणांवर एनआयएनं छापेमारी केली आहे. ही सर्व ठिकाणं दाऊदचे शार्प शूटर्स (Dawood’s Sharp Shooter), ड्रग्ज पेडलर्स (Drug Peddlers) यांच्याशी निगडीत असल्याचं सांगण्यात येत आहे. याशिवाय दाऊदच्या हवाला ऑपरेटर्सवरही (Hawala Operator) कारवाई करण्यात आली आहे.
NIA raids begin at several locations on the premises of associates of underworld don Dawood Ibrahim. Raids are being done in Nagpada, Goregaon, Borivali, Santacruz, Mumbra, Bhendi Bazar, and other places: National Investigation Agency (NIA)
— ANI (@ANI) May 9, 2022
एएनआय (National Investigation Agency (NIA)) या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार दाऊदशी निगडीत मुंबईतील नागपाडा (Nagpada), गोरेगाव (Goregaon), बोरिवली (Borivali), सांताक्रूझ (Santacruz), मुंब्रा (Mumbra), भेंडी बाजार (Bhendi Bazar) आणि इतर काही ठिकाणी एनआयएनं छापेमारी केली आहे.
खळबळजनक! विद्यार्थी पुन्हा कोरोना व्हायरसच्या विळख्यात; शाळेतील तब्बल 64 जण ‘पॉझिटिव्ह’
अनेक हवाला ऑपरेटर्स आणि ड्रग्ज पेडलर दाऊदशी संबंधित असल्याची माहिती एनआयएला मिळाली होती. फेब्रुवारीमध्या या संदर्भात नोंद घेण्यात आली होती. आजपासून कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे, असंही एनआयएकडून सांगण्यात आलं आहे.
National Investigation Agency (NIA) conducts raids at more than one dozen locations in Mumbai against Pakistan-based gangster Dawood Ibrahim's associates and a few hawala operators pic.twitter.com/mAUq4w8gul
— ANI (@ANI) May 9, 2022