Fake Indian Currency Notes : अबब! तब्बल सात कोटींच्या बनावट नोटा जप्त; परराज्यातील टोळीचा पर्दाफाश

अबब! तब्बल सात कोटींच्या बनावट नोटा जप्त; परराज्यातील टोळीचा पर्दाफाश l Fake Indian Currency Notes seized Mumbai Maharashtra
अबब! तब्बल सात कोटींच्या बनावट नोटा जप्त; परराज्यातील टोळीचा पर्दाफाश l Fake Indian Currency Notes seized Mumbai Maharashtra
Share on Social Sites

मुंबई l Mumbai :

आर्थिक राजधानी मुंबईत भारतीय चलनाच्या बनावट नोटा छापून (Fake Indian Currency Notes) वितरीत करण्याच्या उद्देशाने आलेल्या एका आंतरराज्यीय टोळीला आज (दि. २६ जानेवारी) रोजी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या टोळीकडून थोडेथोडके नव्हे, तर तब्बल सात कोटी रुपये, ७ वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल फोन्स (Mobile Phones), एक लॅपटॉप (Laptop) आणि काही कागदपत्रे जप्त करण्यात आली आहे. मुंबईतील दहिसर (Dahisar area) परिसरात या टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

संजय राऊतांचा विरोधकांवर घणाघात; मुख्यमंत्र्यांवर टीका करणारे ‘नामर्द’

मुंबई शहरात बनावट चलनी नोटा छापून त्या दैनंदिन व्यवहारात आणल्या जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी आपल्या गोपनीय माहितीदारामार्फत या प्रकाराची संपूर्ण माहिती काढली होती.

चार व्यक्ती २००० रुपये किमतीच्या बनावट नोटा विक्री करण्यासाठी दहिसरमध्ये येणार असल्याचे पोलिसांना कळले. त्याप्रमाणे माहिती मिळालेल्या गाडीची झडती घेतली असता या गाडीमध्ये २००० रुपयांच्या नोटांचे २५० बंडल आढळून आले.

२००० रुपयांच्या एकूण २५ हजार नोटा असे एकूण पाच कोटी रुपयांच्या बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. त्यानंतर सविस्तर कारवाई करून, आरोपींची झडती घेतल्यानंतर पोलिसांना ७ वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल फोन्स, एक लॅपटॉप, आधार कार्ड (Aadhar Card), पॅनकार्ड (PAN Card), वाहन चालक परवाना (Driver’s License), निवडणूक आयोगाचे ओळखपत्र (Election Commission Identity Card) आणि २८,१७० रोख रक्कम सापडली आहे.

स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी हे आरोपी बनावट नोटा छापून त्यांचे वितरण करत होते. या प्रकरणी सविस्तर पंचनामा करण्यात आला असून सात जणांच्या टोळीला अटकही करण्यात आली आहे.

दुर्दैवी! शाळेत ध्वजारोहणावेळी विद्यार्थ्याचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी

See also  ...तर निवडणूक घेण्यास काय हरकत? सुप्रीम कोर्टाकडून राज्य निवडणूक आयोगाला निर्देश

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?

See also  मोठा कट उधळला! महाराष्ट्राकडे स्फोटकांसह निघालेले 4 खलिस्तानी दहशतवादी अटकेत

Share on Social Sites