नवी दिल्ली l New Delhi :
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीनचे (All India Majlis-e-Ittehadul Muslimeen (AIMIM) अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi, President and MP) यांच्या गाडीवर गोळीबार झाला आहे. आज (दि. ०३) मेरठच्या किथौध भागातून (Meerut) दिल्लीला जात असताना दोन लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांच्या ताफ्यावर गोळ्या झाडल्या आहेत.
‘असा’ झाला डॉ. सुवर्णा वाजे यांचा खुनाचा उलगडा; संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात
ANI शी बोलताना ओवेसी म्हणाले, “मी किथौध, मेरठ येथील एका मतदान कार्यक्रमानंतर दिल्लीला निघालो होतो. छाजरसी टोल प्लाझा जवळ (Chhajarsi Toll Plaza) दोन लोकांनी माझ्या वाहनावर सुमारे तीन ते चार गोळ्या झाडल्या. ते एकूण ३-४ लोक होते. माझ्या वाहनाचे टायर पंक्चर झाले, त्यानंतर मी तेथून दुसऱ्या वाहनाने निघालो,” असे त्यांनी सांगितले.
I was leaving for Delhi after a poll event in Kithaur, Meerut (UP). 3-4 rounds of bullets were fired upon my vehicle by 2 people near Chhajarsi toll plaza; they were a total of 3-4 people. Tyres of my vehicle (in pic) punctured, I left on another vehicle: Asaduddin Owaisi to ANI pic.twitter.com/ksV6OWb57h
— ANI (@ANI) February 3, 2022
दरम्यान, या प्रकरणात वापरलेली शस्त्र सापडली असून एका आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
“या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करावी. या घटनेमागे कुणाचा हात होता, याचा तपास करावा. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Chief Minister Yogi Adityanath) आणि मोदी सरकारने (Modi Government) याची चौकशी करावी. एका खासदारावर उघडपणे गोळीबार होणे, कसे शक्य आहे,” असा सवाल ओवेसी यांनी केला.
Dearness Allowance Hike : आनंदवार्ता आलीच; केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात बंपर वाढ