नाशिक l Nashik :
वडिलांबराेबर पाळीव श्वानासोबत फिरत असताना ‘घरी जाते’ असे सांगून गेलेली मुलगी अचानक बेपत्ता झाल्याने तिच्या आई-वडिलांना घाम फुटला. नाशिक शहर (Nashik City Crime) पोलिसांनी शोध घेऊनही मुलगी न मिळाल्याने अखेर श्वान पथकाला (Nashik Dog Squad) पाचारण केले.
या श्वान पथकातील गुगल नामक श्वानाने (Google Dog Nashik) मुलीच्या कपडे, बूट आणि मास्कच्या आधारे माग काढत घरापासून थोड्या अंतरावर अर्ध्या तासातच या मुलीला शोधून काढले. उपनगर परिसरातील भीमनगर (Bhimnagar, Upnagar) येथील ही घटना मुलीला शाेधण्यात थोडा जरी उशीर झाला असता तर गंभीर गुन्हा घडला असता.
उपनगर पोलिसांनी (Upnagar Police) याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यांतर्गत (पोस्को) (Protection of Children from of Sexual offen ceo act (POSCO) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रेयसीने पेटवून दिलेल्या ‘त्या’ युवकाचा अखेर मृत्यू; Valentine Day च्या दिवशी घडलेल्या घटनेने हळहळ
विशेष म्हणजे, अपहृत मुलीला शोधण्याची श्वान पथकाची ही पहिलीच कारवाई ठरली आहे. या कामगिरीची शहरासह जिल्ह्यात कौतुक होत आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, भीमनगर, जेलरोड येथील रहिवाशी रात्री ०८ वाजता जेवण झाल्यानंतर ११ वर्षीय मुलीला घेऊन पाळीव श्वानास फिरवत होते. फिरून झाल्यानंतर घराजवळ आल्याने मुलगी ‘घरी जाते’ असे सांगून गेली. काही वेळाने वडील घरी आले. मुलीचे बूट दिसले नाही म्हणून यांनी पत्नीला विचारले.
मुलगी घरी न आल्याने परिसरात शोध घेतला ही बाब कळल्याने नागरिकांनी गर्दी केली हाेती. उपनगर पोलिसांना ही बाब कळविल्याने निरीक्षक पंकज भालेराव (Inspector Pankaj Bhalerao) यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. शोध मोहीम सुरू केली रात्री १२.३० वाजता श्वान पथकाला पाचारण केले.
पथकातील गुगल श्वानाने मुलीचे बूट, कपडे आणि तिचा मास्क हुंगला. काही वेळात त्याने घरापासून प्राइड लीली सोसायटी (Pride Lily Society), सेंट्रल जेल (Central Jail) समोरील रस्ता असे दोन वेळा मार्ग दाखवले. यामुळे मुलगी जवळच असल्याची खात्री पटली.
अखेर गुगलने आंबेडकरनगर परिसरातील सम्राट गार्डन (Samrat Garden, Ambedkar Nagar) येथे तिला शोधून काढले. पथकाने मुलीला ताब्यात घेतले आणि सुखरूप आई-वडिलांच्या ताब्यात दिले. निरीक्षक पंकज भालेराव, यांच्यासह श्वान पथकाचे गणेश खोंडे, अरुण चव्हाण, सुधीर देसाई, भास्कर गांगुर्डे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
नोकराचा प्रताप! मालकाचे ४० लाख रुपये चोरून गृहकर्जाचे हप्ते मुदतीआधीच भरले