28 ची नवरी, 41 चा नवरदेव, दोघात 13 वर्षाचं अंतर जास्त नाही?, IAS Tina Dabi ने सांगितली त्रिसूत्री

28 ची नवरी, 41 चा नवरदेव, दोघात 13 वर्षाचं अंतर जास्त नाही?, IAS Tina Dabi ने सांगितली त्रिसूत्री l IAS Tina Dabi Dr Pradeep Gawande Love Story age gap between Tina and Pradeep
28 ची नवरी, 41 चा नवरदेव, दोघात 13 वर्षाचं अंतर जास्त नाही?, IAS Tina Dabi ने सांगितली त्रिसूत्री l IAS Tina Dabi Dr Pradeep Gawande Love Story age gap between Tina and Pradeep
Share on Social Sites

मुंबई l Mumbai :

राजस्थानच्या आयएएस अधिकारी टीना डाबी (IAS Tina Dabi) आणि महाराष्ट्राचे डॉ. प्रदीप गावंडे (IAS Dr. Pradeep Gawande) यांच्या लग्नाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. आपल्यापेक्षा 13 वर्षांहून मोठ्या व्यक्तीशी लग्न करणे हा खरे तर जोडीदारासाठी काहीसा जोखिमीचा विषय ठरू शकतो.

MPSC Main Examination : महाराष्ट्र राज्यसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षा 2020 मुलाखतीच्या तारखा जाहीर

मात्र टीना डाबी यांच्यासाठी हा चिंतेचा विषय नाही. नातेसंबंध जोडताना आणि ते टिकवताना कोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे किंबहुना त्यांनी कोणत्या गोष्टींचा विचार केलाय, हे त्यांनी स्पष्ट सांगितले आहे.

राज्यात मास्कमुक्ती झाली हो!

टीना डाबी या 13 वर्षांनी मोठे असलेले डॉ. प्रदीप गावंडे यांच्याशी येत्या दि. 20 एप्रिल रोजी विवाहबद्ध होणार आहे. नुकताच या दोघांचा साखरपुडा झाला. टीना डाबी या घटस्फोटीत आहेत तर डॉ. प्रदीप गावंडे यांचेही राजस्थान केडरमध्येच पोस्टिंग असलेल्या या दोघांचेही प्रेमसंबंध कसे जुळले इथपासून त्यांच्या कमेंट्स, साखरपुडा (IAS Tina Dabi Second Marriage) आदी घटना सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. यातच आता टीना डाबी यांनी जोडिदाराच्या वयासंबंधी केलेली पोस्टही चर्चेत आहे.

तयारीला लागा! २०२२-२३ वर्षात IT क्षेत्रात येणार नोकऱ्यांची लाट; तब्बल ३,६०,००० फ्रेशर्सना मिळणार Job

टीना यांची त्रिसूत्री काय?

28 वर्षांच्या टीना डाबी आता लवकरच 41 वर्षांचे डॉ. प्रदीप गावंडे यांच्याशी विवाहबद्ध होणार आहे. आयुष्यात एखादी वाईट घटना घडली तर ती मागेच सोडून पुढे चालत रहावे, असे त्यांनी एका पोस्टमध्ये म्हटले आहे. डॉ. प्रदीप गावंडे हे त्यांच्यापेक्षा थेट 13 वर्षांनी मोठे आहे, तरीही तुम्ही लग्न करताय, असा प्रश्न एका कमेंटमध्ये टीना यांना विचारण्यात आला होता. त्यावर टीना यांनी नातेसंबंधात तीन गोष्टी पहाव्यात असे म्हटले आहे. जोडीदाराच्या वयापेक्षा त्याचा स्वभाव, कंपॅटेबिलिटी आणि एकमेकांना समजून घेण्याची क्षमता यावरच नाते टिकून राहते. अशी पोस्ट टीना यांनी केली आहे.

कोण आहेत टीना डाबी आणि प्रदीप गावंडे?

टीना डाबी यूपीएससी टॉपर आहे. (Tina Dabi UPSC Topper) त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (Union Public Service Commission UPSC) 2015 च्या परीक्षेत देशात दुसरा क्रमांक पटकावणाऱ्या अधिकारी अतहर खान (Athar Khan) यांच्याशी लग्न केले होते. ते दोघे आयएएसच्या प्रशिक्षणाच्या काळातच एकमेकांच्या प्रेमात (IAS Tina Dabi Love Story) पडले आणि त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे दोघांनाही राजस्थान केडर (Rajasthan Cadre) मिळाले होते. त्याचे 2018 मध्ये लग्न झाले. अतहर मूळचे काश्मीरचे आहेत.

मात्र, हे नाते टिकवण्यात टीना आणि अतहर अयशस्वी ठरले. त्यानंतर दोन वर्षांतच त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला होता. आता टीना यांनी जीवनसाथी म्हणून 2013 च्या बॅचचे आएएस अधिकारी प्रदीप गावंडे यांची निवड केलीय. प्रदीप गावंडे हे मूळचे महाराष्ट्रचे. त्यांचा जन्म दि. 9 सप्टेंबर 1980 रोजी झालाय. त्यांनी औरंगाबादमधून (Aurangabad) MBBS चे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा यूपीएससीकडे वळवला. त्यांनी 2013 मध्ये स्पर्धा परीक्षेत यश मिळवले. ते टीना डाबी यांच्यापेक्षा 13 वर्षांनी मोठे आहे. यापूर्वी 2020 मध्ये ते चुरू (Churu) येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते.

मात्र, सध्या ते राजस्थान येथील राजस्थान पुरातत्व आणि संग्रहालय विभागामध्ये (Rajasthan Archeology and Museum Department) संचालक म्हणून कार्यरत आहेत. कोरोना काळात टीना डाबी आणि प्रदीप यांच्यातील नाते वृद्धींगत झाले. नुकताच त्यांचा साखरपुडा झाला असून दि. 20 एप्रिल रोजी ते विवाहबद्ध होणार आहे.

Photo/Video : रशियाने उद्ध्वस्त केले शहर, हसता-खेळत्या शहरातल्या 5000 लोकांचा मृत्यू


Share on Social Sites
See also  क्या बात हैं.. आता WhatsApp वरुनही चित्रपट, वेबसिरिज पाठवता येणार