नवी दिल्ली l New Delhi :
राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेतली. जवळपास 20 ते 25 मिनिटे दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. या भेटीनंतर महाराष्ट्रातीलच नाही तर देशातील राजकारणात विविध चर्चा रंगण्यास सुरुवात झाली.
College Reopen : ठरलं! राज्यातील युनिव्हर्सिटी कॅम्पस पुन्हा गजबजणार
तसेच राष्ट्रवादी काँग्रेस भाजप सोबत युती करणार का? (NCP BJP alliance) असा प्रश्नही उपस्थित होऊ लागला. मोदींसोबत झालेल्या भेटीनंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद (Sharad Pawar Press Conference) घेतली आणि त्यांनी सर्व प्रश्नांची उत्तरे दिली.
नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या शरद पवार यांची भेट झाल्यावर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार (BJP leader Sudhir Mungantiwar) यांनी म्हटले की, शिवसेनेसोबत आमची जेवढी कटूता आहे तेवढी कटूता राष्ट्रवादी काँग्रेस सोबत नाहीये. यावर शरद पवार म्हणाले, कुणी काय सांगितले मला माहिती नाही. दुसऱ्यांच्या सांगण्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस ही भाजपसोबत जाणार नाही. शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस (Congress) तिन्ही पक्ष मिळून भाजपच्या विरोधात पावलं उचलत आहेत आणि उचलणार.
चिंता वाढली! भारतात Corona च्या नव्या व्हेरिअंटची एन्ट्री, मुंबईत XE आणि कप्पाची पहिली केस
महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi government) कुठलाही धोका नाही. महाविकास आघाडी सरकार आपला 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार आणि त्यानंतर पुन्हा सत्तेत येणार असंही शरद पवारांनी म्हटलं आहे.
भेटीत काय झाली चर्चा ?
महाराष्ट्रातील राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची नियुक्ती अद्यापही प्रलिबित आहे. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा झाली. दुसरा मुद्दा असा की, राज्यसभेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर झालेल्या कारवाईचा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर मांडला.
12 आमदारांच्या नियुक्तीच्या मुद्दयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी विचार करुन योग्य तो निर्णय घेतील असंही शरद पवार म्हणाले आहे.
नवाब मलिकांवरील (Nawab Malik) कारवाईवर कुठलीही चर्चा झाली नसल्याचंही शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे. तसेच संजय राऊत यांच्यावर कारवाई करण्याची काय गरज होती? त्या कारवाई मागचं नेमकं कारण काय? असा प्रश्नही शरद पवारांनी उपस्थित केला आहे.
VAT कमी केल्याचा दिलासा पाच दिवस टिकला, CNG, PNG त ‘इतक्या’ रुपयांची दरवाढ