नवी दिल्ली l New Delhi :
सरकारी ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी मार्च महिन्यासाठी एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमती जारी केल्या आहे. (LPG cylinder price Hike) मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी विना सब्सिडीवाल्या 14 किलोग्रॅम सिलेंडरच्या किमतीत वाढ झाली नाही. तेल कंपन्यांनी कमर्शियल गॅस सिलेंडरच्या (Commercial Gas Cylinders) दरात वाढ केली आहे.
देशातील सर्वात मोठी तेल कंपनी इंडियन ऑइलने (Indian Oil) 19 किलोग्रॅम कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किमतीत 105 रुपयांची वाढ केली आहे. या वाढीनंतर नवी दिल्लीत 19 किलोग्रॅम गॅस सिलेंडरचा नवा दर 2012 रुपये झाला आहे. नव्या किमती दि. 1 मार्च 2022 पासून लागू होणार आहेत.
5 किलो सिलेंडरचा दर 27 रुपयांनी वाढला आहे. त्यामुळे दिल्लीत 5 किलो सिलेंडरचा दर 569 रुपये झाला आहे. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. भारतात सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात एलपीजी सिलेंडरच्या किमती दर महिन्याला ठरवल्या जातात.
Prices of Commercial Gas Cylinder Prices rised by 105 rupees..
Everything which used commercial gas is going to get EXPENSIVE.
Muddi hai toh Mumkin hai 😍 pic.twitter.com/L7s9wc5E8G
— Why So Serious! 🍉 (@SurrealZack) March 1, 2022
मागील महिन्यात फेब्रुवारी 2022 मध्ये कमर्शियल गॅस सिलेंडरच्या दरात 91.50 रुपयांची कपात झाली होती. मात्र या महिन्यात तब्बल 105 रुपयांची वाढ झाली. या महिन्यात घरगुती सिलेंडरच्या दरात वाढ झालेली नाही. मागील महिन्यातही घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात बदल करण्यात आले नव्हते.
दिल्लीत 19 किलोग्रॅम गॅसच्या किंमती 105 रुपयांनी वाढून 2012 रुपये झाल्या आहेत. याआधी दर 1907 रुपये होता. मुंबईत (Mumbai) कमर्शियल गॅसचा दर 1963 रुपये झाला आहे. आधी हा दर 1857 रुपये होता. मुंबईत 106 रुपयांची वाढ झाली आहे.
Maratha Reservation : संभाजीराजेंनी उपोषण सोडलं, राज्य सरकारकडून ‘या’ मुख्य मागण्या मान्य
14 किलोग्रॅम सिलेंडरचा दर (Price of 14 kg Cylinder)
दिल्लीत विना सब्सिडी 14.2 किलोग्रॅम सिलेंडरचा दर 899.50 रुपये आहे. मुंबईतही घरगुती गॅसचा दर 899.50 रुपये आहे. घरगुती गॅस सिलेंडरचा दर तपासण्यासाठी सरकारी तेल कंपनी IOC च्या वेबसाइटवर जावं लागेल. इथे कंपन्या दर महिन्याला नवे दर जारी करते. https://iocl.com/Products/IndaneGas.aspx या लिंकवर तुम्ही शहरातील सिलेंडरचा दर तपासू शकता.
आपण ह्या बातम्या वाचल्यात का?
शिवसेनेला मोठा धक्का; यशवंत जाधव यांच्या घरी IT विभागाची धाड
तुम्हालाही Typing येत असेल तर हि संधी सोडू नका; MPSC तर्फे 'या' पदांसाठी होतेय भ...
'देवेंद्रनीतीचा' पुन्हा विजय! विधान परिषद निवडणुकीत राज्यसभेसारखीच कमाल, भाजपचे ...
सैराटची पुनरावृत्ती, आधी मुलीच्या वडिलांनी धमकावलं, योगेशला अज्ञातांनी भोसकलं