हृदयद्रावक! ५ दिवसांच्या बाळाचा कोरोनामुळे मृत्यू; आईचा रिपोर्ट मात्र निगेटिव्ह : डॉक्टरही हादरले

एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कोरोनामुळे केवळ ५ दिवसांच्या मुलीचा मृत्यू झाला. मात्र नवजात मुलीचा आईचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता l 5 days old new born baby dies due to covid-19
एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कोरोनामुळे केवळ ५ दिवसांच्या मुलीचा मृत्यू झाला. मात्र नवजात मुलीचा आईचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता l 5 days old new born baby dies due to covid-19
Share on Social Sites

ग्वाल्हेर l Gwalior :

कोरोना व्हायरसची (Corona Virus) तिसरी लाट (Corona Third Wave) दिवसेंदिवस भयावह रूप घेताना दिसत आहे. दररोज संपूर्ण देशात मोठ्या संख्येने संक्रमित रुग्णांची नोंद केली जात आहे.

यादरम्यान ग्वाल्हेर (Gwalior News) जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे केवळ ५  दिवसांच्या मुलीचा मृत्यू झाला. मात्र नवजात मुलीचा आईचा रिपोर्ट निगेटिव्ह (Corona Negative Report) आला होता. मुलीच्या जन्मानंतर आई आणि बाळाची कोविड टेस्ट (Covid Test) करण्यात आली. त्यावेळी हा हैराण करणारा खुलासा झाला. (Gwalior 5 day old baby dies due to corona virus, Mothers report was negative even the doctor was shocked)

मुलीच्या जन्माच्या तीन दिवसांनंतर ती सारखी आजारी असल्याने ग्वाल्हेरच्या कमलाराजा रुग्णालयात (Kamalaraja Hospital, Gwalior t) रेफर करण्यात आले होते . येथे २ दिवस मुलीवर उपचार सुरू होते. यानंतर मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. मुलीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे आरोग्य विभाग थक्क झाला आहे.

मुलीच्या आईचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असल्यामुळे पुन्हा नवा प्रश्न डॉक्टरांसमोर उभा राहिला आहे. आता आरोग्य विभागाकडून (Health Department) अन्य कुटुंबातील सदस्यांच्या कोरोना टेस्ट केल्या जात आहे.

See also  नवाब मलिकांच्या मालमत्तेसंदर्भात नाशकात ईडीची धाड

याशिवाय ग्वाल्हेर जिल्ह्यातील सिव्हील सर्जन, स्त्री विभागातील एचओडीसह १२ हून अधिक डॉक्टर आणि नर्सेस कोविड पॉझिटिव्ह (Covid Positive) आले आहे.

See also  डॉ. सुवर्णा वाजे यांचा खून प्रकरणात धक्कादायक माहिती समोर, कौटुंबिक कलहासह 'या' कारणाने खून?

Share on Social Sites