मुंबई l Mumbai :
सोशल मीडिया ॲप ट्वीटरची (Twitter) मालकी टेस्लाचे सीईओ एलोन मस्क (Tesla CEO Elon Musk) यांच्याकडे गेल्यानंतर ट्वीटरमध्ये काही बदल होतील असं आधीपासूनच बोललं जात होतं.
ठाकरे सरकारला ‘जोर का झटका’; दोन आठवड्यात निवडणुका जाहीर करण्याचे ‘सर्वोच्च’ आदेश
त्याप्रमाणे आता यात हळूहळू बदल होऊ लागले आहे. इलॉन मस्क यांनी म्हटलं की, ट्विटर व्यावसायिक (Twitter Business) आणि सरकारी (Twitter Government) वापरकर्त्यांकडून नाममात्र शुल्क आकारू शकते. मात्र, सामान्य यूजर्ससाठी ट्वीटर नेहमीच फ्री असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. (Twitter will no longer be free Elon Musk made a big announcement)
“ट्विटर नेहमी सामान्य यूजरसाठी विनामूल्य असेल. परंतु व्यावसायिक किंवा सरकारी वापरकर्त्यांना नाममात्र शुल्क आकारले जाऊ शकते,” असं ट्वीट इलॉन मस्क यांनी केलं आहे.
Twitter will always be free for casual users, but maybe a slight cost for commercial/government users
— Elon Musk (@elonmusk) May 3, 2022