
नाशिक l Nashik :
नाशिकचे पोलीस (Nashik Police) आयुक्त दीपक पांडेय (CP Deepak Pandey) यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना लिहिलेल्या पत्राने खळबळ उडाली आहे. हेल्मेट नाही, तर पेट्रोल नाही, (No Helmet No Petrol) असा आदेश दिल्यामुळे चर्चेत आलेले आयपीएस दिपक पांडेय (IPS Deepak Pandey) पुन्हा एकदा नव्याने चर्चेत आले आहे. ते म्हणजे, त्यांनी पोलीस महासंचालकांना (Director General of Police DGP) लिहिलेल्या पत्रामुळे दीपक पांडेय यांनी थेट महसूल यंत्रणांना टार्गेट केले आहे. (CP Deepak Pandey writes letter to Director General of Police)
‘यांनी मशिदीचे भोंगे नाही काढले तर…’; राज ठाकरेंचा थेट इशारा : वाचा भाषणातील ठळक मुद्दे
या पत्रातून त्यांनी थेट महसूल यंत्रणेकडून कार्यकारी दंडाधिकारी पदाचे अधिकार काढून घेण्याची मागणी केली आहे. भूमाफिया (Land Mafia) महसूल अधिकारी ना हाताशी धरून सर्वसामान्य नागरिकांचा छळ करून वित्तीय आणि जिवितास धोका निर्माण करत आहेत. भूमाफियाकडून नागरिकांची सुटका व्हावी कायदा सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण होऊ, नये यासाठी महसूल अधिकारीकडे असणारे कार्यकारी दंडाधिकारी पदाचे अधिकार काढून घ्यावे, अशी मागणी त्यांनी या पत्रातून केली आहे.
Nashik : देवळाली जवळ पवन एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले; एकाचा मृत्यू : अनेक जखमी
महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडे असलेले अधिकार आरडीएक्स (RDX) आणि डिटोनेटर (Detonator) सारखे आहे. यातून एक जिवंत बॉम्ब (Live Bomb) तयार होत असून तो भूमाफियांच्या मर्जीप्रमाणे वागतो. हे भूमाफिया महसूल अधिकाऱ्यांना हाताशी धरून सर्वसामान्य नागरिकांचा छळ करून वित्तीय आणि जिवितास धोका निर्माण करत आहे, असा गंभीर आरोप पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी आपल्या पत्रातून केला आहे. दिपक पांडेय यांच्या या पत्रामुळे महसूल विभाग (Revenue Department) आणि गृहखात्यामध्ये (State Home Department) संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.
महसूल अधिकाऱ्यांकडे असणारे अधिकार RDX सारखे तर, आणि कार्यकारी दंडाधिकारी यांच्याकडे असणारे अधिकार Detonator सारखे आहे, यातून एक जिवंत बॉंम्ब बनतो जो भूमाफिया यांच्यां मर्जीप्रमाणे वागतो. शहरीकरण (Urbanization), औद्योगीकरण (Industrialization), आधुनिकीकरण (Modernization) जिथे झाले तिथे अधिकार पोलीस आयुक्तालयाच्या हातात द्या मालेगांव (Malegaon) सारख्या शहराला आयुक्तालयाच्या दर्जा देण्याची मागणी दीपक पांडेय यांनी केली आहे.
‘दोघांना’ हेल्मेट सक्ती करणारे नाशिकचे पोलिस आयुक्तांनी मागितली बदली
नाशिक जिल्ह्याच्या (Nashik District) धर्तीवर, ठाणे (Thane), पुणे (Pune), औरंगाबाद (Aurangabad), नागपूर (Nagpur) यासह नक्षलग्रस्त गडचिरोली (Naxal Affected Gadchiroli), गोंदिया (Gondia), चंद्रपूर (Chandrapur) ह्या संपूर्ण जिल्ह्यास पोलीस आयुक्तालय घोषीत करावे, अशी मागणीही दीपक पांडेय यांनी केली आहे.
एकाच जिल्ह्यात दोन दोन यंत्रणा असल्याने, जिल्हा दंडाधिकारी कार्यालय येथे दंडाधिकारी शाखा (Magistrate Branch) आणि पोलीस आयुक्त कार्यलयात असणारी दंडाधिकारी शाखा यांच्या कामाचे स्वरूप एकच असल्याने जिल्हा दंडाधिकारी शाखा पोलीस आयुक्त कार्यलयात विलीन कराव्यात, ग्रामीण पोलीस दलाचे (Rural Police) आयुक्तालयात विलीनीकरण करावे याने साधन संपत्तीची बचत होईल, असेही दीपक पांडेय यांनी पत्रात म्हटले आहे.
आकाशात दिसलेल्या रहस्यमयी आगीच्या गोळ्या संदर्भात अपडेट, सापडले अवशेष
आपण ह्या बातम्या वाचल्यात का?
Today's Horoscope : जाणून घ्या आजचे तुमचे राशी मंथन अन् पंचांग, गुरुवार, 04 ऑगस्...
मोदी सरकारचं आणखी एक मोठ गिफ्ट; स्वस्तात पूर्ण होणार घराचं स्वप्न
महागाईचा भोंगा! मोडला ‘इतक्या’ वर्षांचा रेकॉर्ड; सर्वच वस्तूंच्या किमती वाढल्या
Video : स्वतःशीच शुभमंगल सावधान! अखेर 'तो' बहुचर्चित आत्मविवाह संपन्न; आता तयारी...