मुंबई l Mumbai :
केरळमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एक हसतं खेळतं घर उद्ध्वस्त झाले आहे. लग्नाचे फोटोशूट करणे एका नवं दाम्पत्याच्या जीवावर बेतले आहे. लग्नाला अवघे 20 दिवसच झाले असताना नवरा आणि नवरीसोबत नदीकिनारी फोटोशूट करताना अपघात झाला आहे.
त्यामुळे नव दाम्पत्याचे सुखी संसाराचे स्वप्न अधूरे राहिले आहे. केरळमधील (Keral News) जानकीकाडू (Janakikadu) जवळील कुट्टियाडी नदीच्या (Kuttiadi Janakikadu River) किनारी ही घटना घडली आहे. सोमवारी (दि. 04) येथे नवरा आणि नवरी फोटोशूटचा आनंद घेत होते.
फाइव्ह स्टार हॉटेलमधील Rave Party चा भांडाफोड.. सेलिब्रिटींच्या मुलांसह 148 VIP ना बेड्या
फोटोशूट सुरू असताना अचानक नवरदेवाचा पाय सरकला आणि सोबतच नवरी देखील वाहत्या पाण्यात वाहू लागली. या घटनेत नवरदेवाचा मृत्यू झाला आहे. नवरी पाण्यात बुडताना पाहून तिला वाचवण्यात यश आले आणि एका जवळील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात नवरीलाही गंभीर जखम झाली आहे. दि. 14 मार्च रोजी दोघे लग्न बंधनात अडकले होते. नवरदेवाचे नाव रेजिल (Regil) असल्याचे समोर आले असून तो पेरंबराजवळील कांडियगडचा (Perambara, Kandaghat) राहणारा होता.
आकाशात दिसलेल्या रहस्यमयी आगीच्या गोळ्या संदर्भात अपडेट, सापडले अवशेष
पेरूवन्नमुझी पोलिसांनी (Peruvannamuzhi Police) दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यात कुट्टियाडी नदीजवळ अनेक पर्यटकांच्या मृत्यूचे वृत्त समोर आले आहे. पर्यटकांना नदीमधील खोल खड्ड्यांबाबत माहिती नसते. आणि ते उत्साहाच्या भरात नदीत उतरतात. रेजिलला पोहता येत नव्हते . खडकावरुन पाय घसरल्यानंतर तो नदीतील खोल खड्ड्यात अडकला आणि श्वास गुदमरल्यामुळे त्याचा मृत्यू झाला.
केंद्र सरकारकडून ‘या’ 22 YouTube चॅनेल्सवर बंदी, ४ पाकिस्तानी चॅनेल्सचाही समावेश
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात अद्याप तपास सुरू आहे. तपासाअंती घडलेल्या प्रकाराबद्दल नेमके सांगता येईल. नवरदेवाच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, दाम्पत्याने अनेक कारणांमुळे आऊटडोर वेडिंग शूट दि. 4 एप्रिलपर्यंत पोस्टपोंड करण्यात आले होते. सोमवारी सकाळी 7 वाजल्यापासून फोटोशूट सुरू केले होते. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
संजय राऊतांना ED चा दणका, अलिबागमधील 8 प्लॉट, दादरमधील फ्लॅट जप्त
आपण ह्या बातम्या वाचल्यात का?
Today’s Horoscope : जाणून घ्या आजचे पंचांग अन् राशी मंथन, सोमवार, 29 ऑगस्ट 2022
दुधाच्या ट्रकचा आणि टेम्पोचा भीषण अपघात, 5 जणांचा जागीच मृत्यू : खान्देशातील दुर...
Vinak Mete Death : मराठा आंदोलनांचा बुलंद आवाज हरपला; विनायक मेटे यांचे निधन
आत्महत्या नव्हे हत्याकांड! म्हैसाळमधील ‘त्या’ 9 जणांच्या मृत्यूचा अखेर उलगडा; तप...