
नवी दिल्ली l New Delhi :
‘सेक्स वर्कर्स’च्या (Sex Worker) कामात पोलीसांनी कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करू नये, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) राज्य आणि केंद्राशासित प्रदेशातील (Union Territory) पोलीसांनी दिला आहे. न्यायालयाने सेक्स वर्कला व्यवसाय म्हणून मान्यता दिली असून पोलीसांनी वयस्क आणि सहमतीने सेक्स वर्क करणाऱ्या महिलांवर कोणतीही गुन्हेगारी कारवाई करून नये, असेही म्हटलेले आहे.
Really? 😂 What a joke.. This is going to o be legal and no criminal act, so from this time everyone going to the prostitute and doing sex freely 😂 and people's saying we doing a legal thing , sex racket jindabad.#Prostitution
— Vivek Rajliwal (Babli) (@vivekrajliwal) May 26, 2022
सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे की, “सेक्स वर्कर्सनादेखील कायद्यानुसार प्रतिष्ठा आणि सुरक्षेचे हक्क आहेत. न्यायाधिश एल. नागेश्वर राव (Judge L. Nageshwar Rao), बी. आर. गवई (B R Gavai) आणि ए. एस. बोपन्ना (A. S. Bopanna) यांच्या खंडपीठाने सेक्स वर्कर्सच्या अधिकारांना सुरक्षित करण्याच्या दृष्टीने आदेश दिला आहे की, सेक्स वर्कर्सना देखील कायद्यानुसार समान संरक्षणाचा अधिकार आहे.”
Few Points that arise, now:
1. Mandated Aadhar linking?
2. Sex Workers can register it's profession having all it's licenced sex worker with salary, PF, tax, medical, health, life insurance etc.
3. Non licensed/ expired sex worker shall be non-consenting!— Utkarsh Sinha (ioza.in) (@UtkarshSinha25) May 26, 2022
…तर पोलीसांनी कारवाई करू नये
खंडपीठाने पुढे म्हटलं आहे की, “जेव्हा एखादी सेस्क वर्कर महिला वयस्क आहे आणि तिच्या मर्जीनुसार ती हे काम करत आहे, तर पोलीसांनी तिच्यावर गुन्हेगारी कारवाई करणे टाळावे. या देशातील प्रत्येक व्यक्तीला घटनेच्या कलम 21 (Section 21) नुसार सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. जेव्हा पोलीस छापा टाकते तेव्हा सेक्स वर्कर्सना अटक किंवा त्रास देऊ नये. कारण, आपल्या इच्छेने सेक्स वर्कमध्ये सहभागी होणे बेकायदेशीर नाही. फक्त वेश्यालय चालविणे बेकायदेशीर आहे.”
“एखादी महिला सेक्स वर्कर आहे, निव्वळ या कारणावरून त्या महिलेला तिच्या मुलांपासून वेगळे करता कामा नये. कारण, सन्मानाने जगण्याचा अधिकार त्या महिलेला आणि तिच्या मुलांनाही आहे. जर एखादी अल्पवयीन मुलगी वेश्यालयात आढळून आली किंवा सेक्स वर्क करताना दिसून आली, तेव्हा असे मानून चालणार नाही की, त्या मुलीची तस्करी करून तिथे आणण्यात आली आहे”, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे.
सुप्रीम कोर्ट ने सेक्स वर्क को पेशा माना है। SC ने कहा है कि पुलिस को सहमति से सेक्स करने वाली महिलाओं और पुरुषों के खिलाफ कार्रवाई नहीं करनी चाहिए। कोर्ट ने कहा कि वेश्यालय चलाना गलत है लेकिन सेक्स वर्कर के खिलाफ आपराधिक कार्रवाई नहीं कर सकती पुलिस।#Sexworker
— Gaurav Agrawal (@GauravAgrawaal) May 26, 2022
सेक्स वर्कर्सना तातडीने मदत देण्यात यावी (Sex workers should be given immediate help)
“जर एखाद्या सेक्स वर्करवर यौन शोषण होत असेल, तर तिला कायद्यानुसार मेडिकल मदतीसहीत इतर सुविधाही देण्यात यावी. असे आढळून आले आहे की, सेक्स वर्कर्सवर पोलीस क्रूरपणे आणि हिंसकपणे वागणूक देतात. यातून समाजातील एका विशिष्ट वर्गाच्या अधिकारांना मान्यता मिळालेली नाही, असे दिसून येते. पोलीस आणि तत्सम कायदेशीर संस्थांना सेक्स वर्कर्सच्या अधिकारांबाबतील संवेदनशीर असायला हवे”, असे कोर्टाने म्हटलेलं आहे.
“सेक्स वर्कर्सनादेखील इतर नागरिकांसारखे संविधानानुसार मूलभूत मानवाधिकार आणि इतर अधिकार आहेत. पोलीसांनी देखील सेक्स वर्कर्ससोबत सन्मानाने वागावे आणि मौखिक किंवा शारीरिक रुपाने अनादर करू नये. तसेच यौन शोषणासाठी विवश करू नये”, असे आदेश खंडपीठाने दिलेले आहेत.
प्रतीक्षा संपली! KTM RC 390 चे नवीन मॉडेल लाँच; जाणून घ्या किंमत, फिचर्स अन् बरचं काही