
मुंबई l Mumbai :
आपल्यापैकी अनेकांची सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर (social media platforms) अकाऊंट्स असतील. बराचसा वेळ आपण विविध सोशल मीडिया साईट्सवर घालवतही असाल. काहींना तर जवळपास त्याचे व्यसन लागल्यासारख हि असेल. काही तर दिवस रात्र सोशल मीडियावर पडीक असतात. त्यातून विशेष असा काही फायदा होत नाही.
मात्र, काही तरुण-तरुणी सोशल मीडियाच्या माध्यमातून बक्कळ पैसे देखील कमवतात. होय! अमेरिकेतील एका सॉफ्टवेअर इंजिनियरने (American Software Engineer) युट्युबचा (YouTube) वापर करून केवळ ४२ सेकंदांमध्ये १ कोटी ७५ लाख रुपयांची कमाई केली आहे. (Youtuber Earned 1 Crore 75 Lakh Rupees in 47 Seconds). जोनाथन मा (Jonathan Ma) असे या तरुणाचे नाव असून सध्या सर्वत्र त्याच्या या कामगिरीची जोरदार चर्चा सुरू आहे.
भयंकर! Google वर ‘कॉल गर्ल’ सर्च केलं अन्…, पुढे जे घडलं ते वाचून बसेल धक्का
जोनाथन ‘जोमा टेक’ (Joma Tech) नावाचे युट्युब चॅनल चालवतो. (Joma Tech YouTube Channel) विविध टॅक्सची पूर्तता करून शेवटी त्याच्या हातात थोडे थोडके नव्हे तर तब्बल १ कोटी ४० लाख रुपये आले आहे. अलीकडेच ‘झी न्यूज’ने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे.
जोनाथन मा सध्या एक फुलटाईम युट्युबर (YouTuber) आहे. युट्युबर होण्यापूर्वी त्याने फेसबुक (Facebook) आणि गुगलसारख्या (Google) मोठ्या कंपन्यांमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून नोकरी केलेली आहे. सध्या तो युट्युबवर कॉम्प्युटर प्रोग्रामिंग (Computer Programming), क्रिप्टो (Crypto) आणि टेक्नोलॉजीशी संबंधित व्हिडिओ बनवतो. युट्युबवर त्यांचे १६ लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स (Subscribers) आहे. त्याला भविष्यात चित्रपट दिग्दर्शक व निर्माता बनण्याची इच्छा आहे. त्यामुळे पुरेसे पैसे मिळवण्यासाठी त्यांने NFT (Nonfungible-Token) लाँच केले. जेणेकरून तो त्याचे स्वप्न पूर्ण करू शकेल.
‘बिझनेस इनसाइडर’ने दिलेल्या वृत्तानुसार, जोनाथन मानं त्याचे NFT कलेक्शन रिलीज केले आहे. NFT कलेक्शनसाठी त्याने डिसकॉर्ड सर्व्हर (Discord Server) तयार केले आहे. हा असा सर्व्हर आहे, ज्या ठिकाणी फक्त समान सर्व्हर असलेले लोकच त्यांचे NFT कलेक्शन पाहू शकतील. म्हणजेच, ज्या कुणाकडे जोनाथनचा NFT असेल तीच व्यक्ती प्रायव्हेट डिसकॉर्ड पाहू शकेल.
तयारीला लागा! २०२२-२३ वर्षात IT क्षेत्रात येणार नोकऱ्यांची लाट; तब्बल ३,६०,००० फ्रेशर्सना मिळणार Job
जोनाथनने या महिन्याच्या सुरुवातीला त्याचे ‘वॅक्स्ड डॉगॉस’ (Vaxxed Doggos) हे कलेक्शन रिलीज केले आहे. ज्यांना NFT बद्दल माहिती नाही त्यांना, NFT म्हणजे काय? हा प्रश्न पडणे साहजिक आहे. नॉन-फंजिबल टोकन (Non-Fungible Token) हा NFTचा फुलफॉर्म आहे.
NFT एक डिजिटल आयटम असून ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी (Blockchain Technology) वापरून त्याची खरेदी करता येते. क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) आणि NFT स्पेशलाईज्ड प्लॅटफॉर्मवर त्यांची खरेदी-विक्री होते.
डॅप रडारनुसार (DappRadar), गेल्या वर्षी १८ हजार कोटींहून अधिक NFT विकले गेले होते. सध्याच्या इतर अनेक तरुणांप्रमाणे, जोनाथनलाही क्रिप्टोकरन्सीमध्ये रस आहे. याच दरम्यान जोनाथनला स्वत:चे कलेक्शन लाँच करण्याची आयडिया सुचली. त्याने आपल्या फॅन्स आणि सब्सक्रायबर्ससाठी NFT कलेक्शन सुरू केले. जेणेकरून ते NFTची सहज खरेदी-विक्री करू शकतील. यातूनच त्याला आता कोट्यवधी रुपयांचा फायदा झाला आहे.
चिकन आणि अंडी खाणाऱ्यांनो सावधान! राज्यात Bird Flu चा शिरकाव