
मुंबई l Mumbai :
मुंबई दहशतवाद विरोधी पथकाची (Mumbai Anti-Terrorism Squad) स्थापना करणारे आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जाणारे निवृत्त आयपीएस अधिकारी आफताब अहमद खान (ए. ए. खान) (Encounter Specialist Retd. IPS officer Aftab Ahmed Khan) यांचे शुक्रवारी मुंबईतील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. आफताब खान हे १९६३च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. त्यांनी १९९५ मध्ये पोलीस सेवेतून राजीनामा दिला होता.
त्यांच्या निधनाने दहशतवादी आणि अंडरवर्ल्डसाठी कर्दनकाळ ठरलेला एक डॅशिंग अधिकारी काळाच्या पडद्याआड गेला आहे. मुंबईतील एका पोलीस अधिकाऱ्याने आफताब खान यांच्या निधनाबाबत माहिती दिली आहे. आफताब यांना काही दिवसांपूर्वी करोना (Corona) संसर्गाची लागण झाली होती. त्यानंतर अंधेरीतील एका खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते.
तिथे उपचारानंतर दोन आठवड्यांपूर्वीच त्यांनी करोनावर मात केली होती व ते बरे झाले होते. मात्र काल शुक्रवारी (२१ जानेवारी) पुन्हा त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले पण त्याआधीच त्यांचे निधन झाले. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले, असे या अधिकाऱ्याने सांगितले. खान यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे आणि मुलगी असा परिवार आहे.
Retired IPS officer Aftab Ahmed Khan, credited with establishing the Anti-Terrorism Squad (ATS) in the Mumbai police three decades ago – the first such elite force in the country – died on Friday. pic.twitter.com/Y8WcOxRyIE
— Muslims of India (@WeIndianMuslims) January 21, 2022
स्वाटच्या धर्तीवर एटीएसची स्थापना (Establishment of ATS on the lines of SWAT)
आफताब अहमद खान उर्फ ए. ए. खान हे दहशतवाद्यांसाठी आणि गुन्हेगारांसाठी कर्दनकाळ बनले होते. १९९७ मध्ये ते सेवेतून निवृत्त होणार होते पण त्याआधीच १९९५ मध्ये त्यांनी पोलीस दलातून राजीनामा दिला होता. त्यावेळी ते पोलीस महानिरीक्षक या पदावर होते. मुंबई दहशतवाद विरोधी पथक स्थापन करण्याचे श्रेय ए. ए. खान यांना दिले जाते. देशातील हे पहिले दहशतवाद विरोधी पथक ठरले होते. १९९० मध्ये फिलाडेल्फिया (Philadelphia) आणि लॉस एंजल्स (Los Angeles) पोलिसांच्या स्पेशल वेपन्स अँड टॅक्टिकल टीम (Special Weapons and Tactical Team (SWAT) याच्या धर्तीवर त्यांनी एटीएसची स्थापना केली होती. या पथकाने मोठा दरारा निर्माण केला.
शूटआऊट अॅट लोखंडवाला (Shootout At Lokhandwala)
डी गँगचा (D Gang) कुख्यात गँगस्टर माया डोळस (Gangster Maya Dolas) याच्या एन्काउंटरमुळे ए. ए. खान चर्चेत आले होते. खान यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कमांडोजचे साह्य घेऊन १६ नोव्हेंबर १९९१ रोजी लोखंडवाला कॉम्प्लेक्स (Lokhandwala complex) भागात एन्काउंटरमध्ये माया डोळसला टिपले होते. भरदिवसा झालेल्या या एन्काउंटर दरम्यान ४५० राउंड्स फायर करण्यात आल्या होता. या घटनेवर शूटआऊट अॅट लोखंडवाला हा सिनेमाही प्रदर्शित झालेला आहे. सिनेमात विवेक ओबेरॉयने (Actor Vivek Oberoi) माया डोळसची तर संजय दत्तने (Actor Sanjay Dutt) ए. ए. खान यांची भूमिका साकारली होती.
Kirti Shiledar : ज्येष्ठ गायिका आणि संगीत नाटक कलाकार कीर्ती शिलेदार यांचे निधन