ठरलं! यंदा एप्रिल अखेरपर्यंत शाळा सुरू राहणार, रविवारची सुटीही रद्द, विद्यार्थ्यांच्या 100 टक्के उपस्थितीला परवानगी

ठरलं! यंदा एप्रिल अखेरपर्यंत शाळा सुरू राहणार, रविवारची सुटीही रद्द, विद्यार्थ्यांच्या 100 टक्के उपस्थितीला परवानगी l School for class first to nine and eleven to be open fulltime till April end
ठरलं! यंदा एप्रिल अखेरपर्यंत शाळा सुरू राहणार, रविवारची सुटीही रद्द, विद्यार्थ्यांच्या 100 टक्के उपस्थितीला परवानगी l School for class first to nine and eleven to be open fulltime till April end
Share on Social Sites

मुंबई l Mumbai :

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव (Covid 19) दिवसेंदिवस कमी होत असल्याने कोरोनाविषयक निर्बंधही राज्यासह देशात टप्प्याटप्प्याने उठवण्यात येत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी शासनाने काही नवे आदेश जारी केले आहे. यानुसार इयत्ता पहिली ते नववी (Class I to IX) आणि अकरावीच्या शाळा (Class XI) मार्च अखेर ते एप्रिलपर्यंत पूर्णवेळ सुरू ठेवण्यात येणार आहे.

इयत्ता पहिली ते नववी आणि अकरावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा एप्रिल महिन्यातील तिसऱ्या आठवड्यात घेण्यात याव्यात आणि निकाल मे महिन्यात जाहीर केला जावा.

Blog (विशेष लेख) : उद्धवजी, सरकार विषयीच्या सहानुभूतीला ‘घर-घर’ लागेल असे निर्णय घेऊ नका…

सकाळच्या सत्रात शाळा घेणे आवश्यक असल्यास अध्यापनाच्या तासिका पूर्णवेळ घ्याव्यात, असे या सूचनेत म्हटले आहे. तसेच दररोज विद्यार्थ्यांच्या १०० टक्के उपस्थितीसह परवानगी देण्यात आली आहे. (Permission is given with 100 percent attendance of students every day in School) मात्र, या आदेशामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण होईल, असे काही शिक्षक संघटनांचे मत आहे.

https://twitter.com/NILESHMAINKAR/status/1507206806279684098

शिक्षण विभागाच्या परिपत्रकामुळे शाळांमध्ये गोंधळ

शालेय शिक्षण विभागाच्या (Education Department) परिपत्रकामुळे शाळांमध्ये गोंधळ वाढण्याची शक्यता आहे. कारण मुंबईतील शाळांमधील ९वीच्या परीक्षा सुरू झालेल्या आहे ज्या दिवशी दहावीचा पेपर नसतो त्यादिवशी शाळांनी ९वीच्या परीक्षांचे आयोजन केले आहे.

त्यामुळे एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात परीक्षा पुन्हा कशा घेणार? रविवारी ऐच्छिक शाळा भरविण्याबाबत सूचना असल्या तरी मुंबईतील अनेक शाळांमध्ये ५ दिवसांचा आठवडा तर काही ठिकाणी दुसऱ्या व चौथ्या शनिवारी सुट्टी दिली जाते याचा विचार शिक्षण विभागाने केलेला दिसत नाही हे नियोजन एक महिना आधी केले असते तर अधिक परिणामकारक अंमलबजावणी झाली असती मात्र शालेय शिक्षण विभागाला उशिरा सूचलेले शहाणपण असून परिपत्रकामुळे शाळांमध्ये गोंधळ वाढणार आहे.

कोरोनाच्या चौथ्या लाटेचं कारण ठरणाऱ्या Omicron BA.2 ची भारतात एन्ट्री; ही लक्षणं दिसल्यास सावध व्हा!

See also  'शिंदे सरकार'मधील मंत्रिमंडळाच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला; 'भाजप'कडून नव्या चेहऱ्यांना संधी?

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?


Share on Social Sites