
नवी दिल्ली l New Delhi :
प्रेषित मोहम्मद (Prophet Muhammad) यांच्या विरोधात टिप्पणी करून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मासह (BJP spokesperson Nupur Sharma) 9 जणांवर दिल्ली पोलीसांनी (Delhi Police) गुन्हा दाखल केलाय. विशेष सेलच्या सायबर युनिटनं एफआयआर (FIR) नोंदवला आहे. या सर्व लोकांवर धर्माविरोधात अशोभनीय वक्तव्य करून वातावरण दूषित केल्याचा आरोप आहे.
औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ असे नामांतर आता करू शकतो पण…;उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
नुपूर शर्मा व्यतिरिक्त सायबर युनिटनं भाजपचे माजी प्रवक्ते नवीन कुमार जिंदाल (Former BJP spokespersons Naveen Kumar Jindal), शादाब चौहान (Shadab Chauhan), सबा नक्वी (Saba Naqvi), मौलान मुफ्ती नदीम (Maulana Mufti Nadeem), अब्दुल रहमान (Abdul Rahman), गुलजार अन्सारी (Gulzar Ansari), अनिल कुमार मीना (Anil Kumar Meena) आणि पूजा शकुन (Pooja Shakun) यांच्यावरही गुन्हा दाखल केलाय. गुन्हा दाखल केल्यानंतर आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
https://twitter.com/TajinderBagga/status/1534563446360264705
नुपूर शर्माने एका टीव्ही डिबेटमध्ये पैगंबर मोहम्मद (Prophet Mohammad TV debate) यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी केली होती. यानंतर वाद अधिकच वाढला. नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याचा अरब देशांनीही निषेध केला होता. भाजपनं नुपूर शर्मा यांना पक्षातून निलंबित केलंय. असं वक्तव्य भाजपच्या मूळ कल्पनेच्या विरोधात असल्याचं पत्र भाजपकडून (Bhartiya Janata Party BJP) जारी करण्यात आलंय.
राज्याचा 12वीचा निकाल 94.22 टक्के; कोकण विभाग अव्वल, पाहा कोणत्या विभागाचा किती टक्के निकाल
नूपुर शर्मानं मागितली माफी
पक्षातून निलंबित झाल्यानंतर नुपूर शर्मा यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफीही मागितलीय. त्या म्हणाल्या, ‘मी माझे शब्द परत घेते. कोणाला दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. माझ्या बोलण्यानं कोणाच्या धार्मिक भावना दुखावल्या असतील, तर मी माझे शब्द परत घेते.’
https://twitter.com/i/status/1534758520041742336