मुंबई l Mumbai :
मुंबईत सीएनजी (Compressed Natural Gas CNG) आणि पीएनजीच्या (Piped Natural Gas (PNG) दरांनी भडका उडाला आहे. मुंबईत मध्यरात्रीपासून सीएनजी आणि पीएनजी महागले आहे. शहरात आज (दि. 06) सकाळपासून सीएनजीच्या दरात तब्बल सात रुपयांनी आणि पाईप्ड कुकिंग गॅसच्या दरात पाच रुपयांनी वाढ झाली आहे.
College Reopen : ठरलं! राज्यातील युनिव्हर्सिटी कॅम्पस पुन्हा गजबजणार
महानगर गॅस लिमिटेडने दरांमध्ये मोठी वाढ केली आहे. नव्या दरानुसार मुंबईत सीएनजी 67 रुपये प्रति किलो आणि पाईप्ड कुकिंग गॅस 41 रुपये प्रति किलो झाला आहे. राज्य सरकारने वॅट (VAT) कमी केला होता. त्यामुळे सीएनजीचे दर कमी होते. पण आता महानगर गॅस लिमिटेडने (Mahanagar Gas Limited) दर वाढवल्याने सामान्य मुंबईकरांना मिळालेला काहीसा दिलासाही आता नाहीसा झाला आहे.
#GasPriceHike | MGL hikes CNG price by Rs 7/kg to Rs 67/kg and Domestic PNG by Rs 5/scm to Rs 41/scm, w.e.f today
▶️IGL hikes CNG price by Rs 2.5/kg to Rs 66.61/kg in Delhi, total hike of Rs 6.6/kg in April
▶️Gujarat Gas hikes CNG price in Gujarat by Rs 6.5/kg to Rs 76.98/kg
— Money Times (@moneytimes_1991) April 6, 2022
महानगर गॅस लिमिडेटच्या निवेदनात नमूद केले आहे की, “ग्राहक-केंद्रित कंपनी असल्याने आम्ही 8 लाखांहून अधिक CNG आणि 18 लाखांहून अधिक घरगुती पाईप्ड गॅस ग्राहकांसाठी किंमती स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला. परंतु गॅसच्या किमतींमध्ये लक्षणीय वाढ होत असल्याने आम्ही दरवाढ करण्याचा निर्णय घेतला.”
चिंता वाढली! भारतात Corona च्या नव्या व्हेरिअंटची एन्ट्री, मुंबईत XE आणि कप्पाची पहिली केस
राज्य सरकारने सीएनजीवरील वॅट 13.5 टक्क्यांनी कमी केला होता. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister and Finance Minister Ajit Pawar) यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडताना वॅट कमी करण्याची घोषणा केल्यानंतर त्यानंतर अधिसूचनाही जारी झाली होती. दि. 1 एप्रिलपासून बदललेले नवीन दर लागू झाले होते. यामुळे महाराष्ट्रात सीएनजी प्रतिकिलो सहा रुपये आणि पाईप्ड कुकिंग गॅस प्रति किलो साडेतीन रुपये स्वस्त झाला होता.
Petrol will stabilise at 140-150 range in short term. That provided the war ends in May and some ease if sanctions or increased production of crude which doesn't look eminent. CNG /PNG will.also increase substantially. Ppl will HV to be smart to use fuel .
— Vishal विशाल 🇮🇳 (@vishalkmumbai) April 6, 2022
वॅट कमी केल्याचा दिलासा पाच दिवसच टिकला (The relief of reducing VAT lasted only five days)
परंतु वॅट कमी केल्याचा फायदा सामान्य मुंबईकरांना फार दिवस मिळाला नाही. या दिलासा मिळून पाच दिवस होत नाहीत तोपर्यंत सीएनजी प्रति किलो सात रुपये आणि पाईप्ड कुकिंग गॅस प्रति किलो पाच रुपयांनी महागला आहे. महानगर गॅस लिमिटेच्या (Mahanagar Gas Limited) या निर्णयामुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री बसत आहे. मध्यरात्रीपासून नवे दर लागू झाल्याने आज (दि. 06) सकाळी घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांना सीएनजी आणि पाईप्ड कुकिंग गॅसमधील दरवाढ पाहायला मिळाली.
मुंबईसह राज्यभरात आधीच पेट्रोल आणि डिझेलचे (Petrol Diesel Price Hike) दर गगनाला भिडले आहे. महाराष्ट्राच्या परभणीत (Parbhani) पेट्रोलने 122 रुपये लिटर दर पार केला आहे. आता सीएनजी आणि पीएनजीच्या (CNG PNG Price Hike) वाढलेल्या दरांनी सामान्याचं जगणंच कठीण केले आहे.
केंद्र सरकारकडून ‘या’ 22 YouTube चॅनेल्सवर बंदी, ४ पाकिस्तानी चॅनेल्सचाही समावेश
टॅक्सी, रिक्षा भाडेवाढीची मागणी (Demand for Taxi, Rickshaw fare Hike)
तीन लाख खाजगी वाहनांव्यतिरिक्त, शहरात पाच लाख सार्वजनिक वाहतूक वाहने आहे, ज्यात रिक्षा, टॅक्सी आणि बस यांचा समावेश आहे, जे नैसर्गिक इंधनावर अवलंबून आहेत. सीएनजीमध्ये झालेल्या दरवाढीचा मोठा फटका टॅक्सी आणि रिक्षाचालकांना बसत आहे. परिणामी टॅक्सी आणि रिक्षाच्या भाड्यात दोन ते पाच रुपयांनी वाढ करण्याची मागणी संघटनेने केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर राष्ट्रवादीची भाजपसोबत युती?, शरद पवारांनी दिल ‘हे’ स्पष्टीकरण
ओला, उबरही दरवाढ करण्याच्या तयारीत (Ola, Uber is also preparing to Hike prices)
तर सीएनजीमध्ये झालेल्या दरवाढीनंतर ओला आणि उबरसारख्या मोबाईल ॲप आधारित टॅक्सी कंपन्यांनीही भाड्यामध्ये वाढ करण्याची तयारी केली आहे. (Ola Uber Price Hike) सीएनजीच्या दरात झालेली वाढ पाहता, प्रवाशांसाठी कॅबमधील एसी चालू करण्याची आमची अजिबात तयारी नाही. वाढलेल्या किमतीमुळे आमचे बजेट कोलमडले आहे, अशी प्रतिक्रिया एका कॅब चालकाने दिली.
संजय राऊतांना ED चा दणका, अलिबागमधील 8 प्लॉट, दादरमधील फ्लॅट जप्त