
पुणे l Pune :
बोर्डाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार दहावी (SSC Exam) आणि बारावीच्या परीक्षा (HSC Exam) पुढील महिन्यात पार पडणार आहेत. वेळापत्रकानुसार दहावीची परीक्षा दि. १५ मार्च पासून तर बारावीची परीक्षा दि. ०४ मार्चपासून सुरू होत आहे.
दरम्यान दहावी आधी पार पडणाऱ्या बारावी परीक्षेसाठी बोर्डाचे हॉल तिकीट (HSC Board Hall Ticket) उद्या बुधवारी (दि. ०९ फेब्रुवारी) दुपारी एक वाजल्यापासून ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. हॉल तिकीट बोर्डाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन उपलब्ध केले जाणार आहे.
शेतकऱ्याच्या जनधन खात्यात जमा झाले चक्क १५ लाख, मोदींचे आभार मानत बांधलं स्वप्नातलं घर आणि मग…
बारावी बोर्डाचे ऑनलाइन हॉल तिकीट www.mahahsscboard.in या संकेत स्थळावर उपलब्ध होणार आहे. दरम्यान हॉलतिकीट मिळवताना काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधायचा असल्याचंही प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, हॉल तिकीट ऑनलाइन (HSC Online Hall Ticket) पद्धतीने प्रिंटिंग करताना विद्यार्थ्याकडून त्यासाठी कोणतेही शुल्क न घेता सदर हॉल तिकीटची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापक, प्राचार्यांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
असे करा हॉल तिकीट डाऊनलोड.. (How To Download HSC Hall Ticket)
-
सर्वात आधी तुम्ही वापरत असलेल्या इंटरनेट ब्राऊजरमधून www.mahahsscboard.in या संकेत स्थळावर जा.
-
त्यांनंतर College login या पर्यायामध्ये जाऊन त्याठिकाणी हॉल तिकीट ऑनलाइन डाउनलोड करु शकता.
RTE राखीव जागांबाबत सरकारचे धोरण कळेना; वारंवार बदलणार्या आदेशाने शाळाही चक्रावल्या
दरम्यान संबधित ऑनलाइन हॉल तिकीट सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील उच्च माध्यमिक शाळा त्यासोबत कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यायचे आहे.
हॉल तिकीटात विषय आणि माध्यम बदला संदर्भात दुरुस्त्या असल्यास उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयाने विभागीय मंडळात जाऊन त्या दुरुस्त करून घ्यावयाच्या असल्याची माहितीही शासनाने दिली आहे.
हॉल तिकीटावर फोटो (Photo), स्वाक्षरी (signature), विद्यार्थ्याचे नाव या संदर्भातील दुरुस्ती बाबत उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय (Higher Secondary School Junior College) यांनी त्यांच्या स्तरावर फक्त त्याची एक प्रत विभागीय मंडळाकडे पाठवायची आहे.
हॉल टिकीट विद्यार्थ्यांकडून हरवल्यास संबंधित शाळा महाविद्यालयांनी पुन्हा प्रिंट काढून त्यावर लाल शाईने ‘द्वितीय प्रत’ (Duplicate)असा शेरा देऊन विद्यार्थ्यांना हॉल तिकीट द्यायचे आहे.
मुक्त विद्यापीठाच्या आजपासून ऑनलाईन परीक्षा; ‘असे’ असेल स्वरुप