नाशिक | Nashik :
शहरातील एका बंद फ्लॅटमध्ये मानवी शरीराचे अवयव (Human Body Parts Found in Nashik) व तुकडे आढळून आल्याची बाब काल रविवारी (दि. २७) रोजी मुंबईनाका पोलिस ठाण्यामागील (Mumbai Naka Police Station) हरिहर सोसायटीमध्ये (Harihar Society) उघडकीस आली आहे. संबंधित फ्लॅट मालकाने १५ वर्षांपूर्वी मेडिकलच्या विद्यार्थ्यांना भाडेतत्त्वावर हा फ्लॅट दिल्याचा दावा केला आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ माजली आहे.
मुंबईनाका पोलिसांनी हे सर्व अवयव ताब्यात घेतले असून जिल्हा रुग्णालयात (Civil Hospital, Nashik) पुढील तपासणीसाठी पाठवले आहे. हा अहवाल आल्यानंतर हे अवयव किती दिवसांचे आहे ही बाब स्पष्ट हाेणार आहे.
नाशिक जिल्ह्यात नात्याला काळिमा फासणारी घटना, पुतण्याचा चुलतीवर तोंड दाबून बलात्कार
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, हरिहर सोसायटीमधील एका फ्लॅटमध्ये प्लास्टिक बकेटमध्ये केमिकल टाकून त्यात मानवी देहाचे आठ कान (Eight Human Ear), मेंदू (Brain) आणि डोळे (Eye) अवयव ठेवले असल्याची माहिती मिळाली. पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत फ्लॅट मालक शिंदे यांची चौकशी केली.
त्यांनी हा फ्लॅट १५ वर्षांपूर्वी मेडिकलच्या विद्यार्थ्यांना भाडेतत्त्वावर दिल्याचे सांगितले. विशेष म्हणजे तेव्हापासून फ्लॅटकडे आलो नसल्याचा दावा त्यांनी केला. विशेष बाब म्हणजे मानवी शरीराचे अवयव केवळ मेडिकल विद्यार्थ्यांना (Medical Student) शिक्षणासाठी मेडिकल महाविद्यालयातच उपलब्ध करून दिले जातात.
कान, चेहरा, आणि मेंदू येथे इतक्या संख्येने कसे आले याचे गूढ वाढले आहे. पोलिसांनी हे अवयव ताब्यात घेतले असून जिल्हा रुग्णालयात पुढील तपासणीसाठी पाठवले आहे. यानंतर हे अवयव फॉरेन्सिक लॅबमध्ये (Forensic Lab) पुढील तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. वरिष्ठ निरीक्षक सुनील रोहकले (Senior Inspector Sunil Rohkale) यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
चोरी झाली म्हणून उघडला बंद फ्लॅट
इमारतीत चोरी झाल्याने रहिवाश्यांनी हा बंद फ्लॅट उघडला असता त्यांना या फ्लॅटमध्ये मानवी देहाचे हे अवयव आढळले. रहिवाश्यांनी ही बाब तात्काळ पोलिसांना कळवली. हा फ्लॅट वयस्कर व्यक्तीच्या मालकीचा असून ते दुसरीकडे राहतात. त्यांनी हा फ्लॅट कान, नाक व घसा तज्ज्ञ डॉक्टरला (Ear, Nose and Throat Specialist Doctor) भाडेतत्त्वावर दिला होता. मात्र अनेक वर्षांपासून हा फ्लॅट बंद होता. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला नाही.
मानवी अवयव ज्या पद्धतीने जतन करून ठेवले गेले ती पद्धत वैद्यकशास्त्राशी निगडित वाटते. अवयवांची कापणी देखील अत्यंत शार्प असून आठ कान डब्यातून मिळालेले आहे. तसेच मेंदूसदृश काही अवयवही आढळले आहे. गाळा ज्यांचा आहे, ते दोन्ही भाऊ डाॅक्टर असून त्यांच्याकडे याबाबत चौकशी केली जात आहे. त्यांच्या या गाळ्यात मागील इतक्या वर्षांपासून मानवाचे हे अवयव कसे आले व कोठून आणले याचा तपास सुरू आहे.
: पौर्णिमा चौगुले, पोलीस उपायुक्त, नाशिक (Pournima Chowgule, Deputy Commissioner of Police, Nashik)
Blog (विशेष लेख) : उद्धवजी, सरकार विषयीच्या सहानुभूतीला ‘घर-घर’ लागेल असे निर्णय घेऊ नका…
आपण ह्या बातम्या वाचल्यात का?
Mohali MMS Leaked : असे बनवले गेले 'ते' व्हिडीओ?; समोर आल्या 'त्या' वॉशरूममधील त...
फिरकीचा जादूगार काळाच्या पडद्याआड; शेन वॉर्नचे निधन
नाशिकचे वादग्रस्त पोलिस आयुक्त दीपक पांडेंची अखेर उचलबांगडी; जयंत नाईकनवरे यांची...
Video : बाईकला ट्रॅक्टरचा सायलेंसर, नंबर प्लेटच्या जागी “बोल देना पाल साहब आये थ...