
मुंबई l Mumbai :
महाराष्ट्र राज्याच्या पोलीस (Maharashtra Police) पदोन्नतीचा आदेश जारी होऊन अवघे 12 तासही उलटलेले नसताना गृहखात्यातून (Maharashtra state Home department) काल (दि. 20) रात्री जारी केलेले आदेश तातडीने स्थगित करण्यात आले आहे.
त्यामुळे राज्याच्या गृहखात्याचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. स्थगितीच्या आदेशामागचं नेमके कारण अद्याप समोर आलेलं नाही. पण पोलीस बदली आणि पदोन्नतीचा (Police Transfer and Promotion) आदेश जारी केल्याच्या दुसऱ्याच दिवशी पदोन्नतीच्या आदेशावर स्थगिती देण्याची वेळ गृहखात्यावर का आली असा सवाल आता जोर धरू लागला आहे.
नाशिकचे वादग्रस्त पोलिस आयुक्त दीपक पांडेंची अखेर उचलबांगडी; जयंत नाईकनवरे यांची नियुक्ती
मुंबई (Mumbai) आणि ठाण्यातील (Thane) पोलीस अधिकाऱ्यांच्या पोलीस पदोन्नतीच्या आदेशाला स्थगिती देण्यात आलेली आहे. यात एकूण पाच पोलिसांची पदोन्नती थांबविण्यात आली आहे. राजेंद्र माने (Rajendra Mane), महेश पाटील (Mahesh Patil), संजय जाधव (Sanjay Jadhav), पंजाबराव उगले (Punjabrao Ugale) आणि दत्तात्रय शिंदे (Dattatraya Shinde) या अधिकाऱ्यांचा यात समावेश आहे.
या पाचही जणांना देण्यात आलेली पदोन्नतील पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आली आहे. तसच पत्रकच राज्याच्या गृहखात्याकडून (State Home Department) जारी करण्यात आले आहे. पोलीस बदलीचा आदेश मात्र कायम ठेवण्यात आलेला आहे. त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
अखेर ‘त्या’ 17 पोलीस कर्मचाऱ्यांचे थेट निलंबन; जाणून घ्या कारण
कोणत्या अधिकाऱ्यांचं प्रमोशन थांबवलं?
1 राजेंद्र माने :
विद्यमान पद :उपायुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई
पदोन्नती पद :अप्पर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, ठाणे शहर (Thane City)
2 महेश पाटील :
विद्यमान पद : पोलीस उप आयुक्त, मिरा-भाईंदर-वसई-विरार-पोलीस आयुक्तालय
पदोन्नती पद : अप्पर पोलीस आयुक्त (वाहतूक), मुंबई (Mumbai)
3 संजय जाधव :
विद्यमान पद : पोलीस अधिक्षक, महामार्ग सुरक्षा पथक, पुणे (Pune)
पदोन्नती पद : अप्पर पोलीस आयुक्त (प्रशासन), ठाणे शहर (Thane City)
4 पंजाबराव उगले :
विद्यमान पद : पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे (Thane)
पदोन्नती पद : अप्पर पोलीस आयुक्त, सशस्त्र पोलीस, मुंबई (Mumbai)
5 दत्तात्रय शिंदे :
विद्यमान पद : पोलीस अधिक्षक, पालघर (Palghar)
पदोन्नती पद : अप्पर पोलीस आयुक्त, संरक्षण व सुरक्षा, मुंबई (Mumbai)
गृहविभागानं जारी केलेलं पत्रक :