
यवतमाळ l Yavatmal :
गरजू व्यक्तींना अत्यल्प दरांमध्ये चांगले भोजन मिळावे या हेतूने सुरु करण्यात आलेल्या शिवभोजन थाळीसंदर्भात एक धक्कादायक प्रकार यवतमाळ जिल्ह्यामध्ये (Yavatmal District) समोर आला आहे.
कमी किंमतीत सर्वांना जेवण उपलब्ध व्हावे या हेतुने सुरु करण्यात आलेल्या या शिवभोजन थाळीच्या दर्जासंदर्भात शंका उपस्थित करणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे . (Shivbhojan Thali Viral Video)
Photo/Video : रशियाने उद्ध्वस्त केले शहर, हसता-खेळत्या शहरातल्या 5000 लोकांचा मृत्यू
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये यवतमाळ जिल्ह्यामधील महागाव (Mahagaon, Yavatmal) येथील एका शिवभोजन थाळी केंद्रावरील अस्वच्छता आणि व्यवस्थापनामधील त्रुटी समोर आल्या आहे. महागाव तालुक्यामधील त्रिमुर्ती महिला बचत गटाच्या (Trimurti Mahila Bachat Gat) माध्यमातून नवीन बस स्टॅण्डसमोर चालवण्यात येणाऱ्या शिवभोजन थाळी केंद्रावरील भांडी शौचालयामध्ये धुतली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.
या केंद्रात ग्राहकांना जी थाळी दिली जाते ती जेवण झाल्यानंतर शौचालयातील पाण्याने धुतली जात असल्याचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे. या धक्कादायक प्रकारामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.
विशेष म्हणजे हे शिवभोजन थाळी केंद्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Nationalist Congress Party NCP) महिलेचे असल्याची माहिती समोर आली आहे. अशा प्रकारे गलिच्छ जागेवर भांडी धुवून त्याच थाळीत पुन्हा भोजन देत असल्याने एक प्रकारे गरिबांची थट्टाच उडवली जात आहे.
https://twitter.com/BJP4Maharashtra/status/1508709136833286144