
अकोला l Akola :
किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर (Kirtankar Nivruti Maharaj Indurikar) काही दिवसांपूर्वी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी चांगलेच चर्चेत आले होते. अशात आता पुन्हा एकदा इंदुरीकर महाराज चर्चेत आले आहे. यावेळी अकोल्यात (Akola) आपल्या किर्तनाच्या व्हिडिओ क्लिप काढून यूट्यूबवर (Indurikar Maharaj YouTube video) अपलोड करणाऱ्यांसाठी त्यांनी विचित्र भाषेचा उपयोग केला (Controversial Statement of Indurikar Maharaj).
आपल्या किर्तनाच्या व्हिडिओ क्लिप यूट्यूबवर (YouTube) टाकणाऱ्यांना इंदुरीकर महाराज म्हणाले, की ‘अशा लोकांची मुलं दिव्यांग जन्माला येतील. त्यांचं वाटोळं होईल.’ या वादग्रस्त विधानानंतर आता ते पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.
खान्देश हादरले.. ब्युटी पार्लर चालक महिलेवर बलात्कार; Facial साठी हॉटेलवर बोलावून..
अकोला शहरातील कोलखेड (Kolkhed) भागात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे (NCP’s district president Sangram Gawande) यांनी इंदुरीकर महाराजांचं किर्तन (Indurikar Maharaj Kirtan) आयोजित केले होते. यावेळी निरुपणा करताना इंदुरीकर महाराजांनी युट्यूबर्सवर सडकून टीका केली.
इंदुरीकर महाराज यावेळी बोलताना म्हणाले, की माझ्या जीवावर आतापर्यंत 4 हजारांवर लोकांनी युट्यूबवर व्हिडिओ अपलोड करून कोट्यावधी रूपये कमावले.
धक्कादायक! उद्योजकाच्या बंगल्यावर भरदिवसा सशस्त्र दरोडा; जाता-जाता घरातील महिलांसमोर डान्स