साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडा (South Superstar Vijay Deverakonda) आणि बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे (Bollywood actress Ananya Panday) यांचा ‘लायगर’ (Liger Movie) हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटाची वाट पाहत होते. प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली होती. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. (Liger film Box office collection)
मात्र, आता चित्रपटाच्या कमाईत सतत घसरण होताना दिसत आहे. पॅन इंडिया चित्रपट ‘लायगर’ प्रदर्शित होऊन आज (दि. 29) 4 दिवस झाले आहेत. वीकेंड संपल्यानंतरही बॉक्स ऑफिसवर ‘लाइगर’ची कमाई सातत्याने घसरत आहे. ‘ओपनिंग डे’ कलेक्शन वगळता उर्वरित दिवसांत या चित्रपटाने निराशाच झाली आहे.
Liger 4 Days WW Box Office Collections!!#VijayDevarakonda #Liger #LigerHuntBegins pic.twitter.com/6lpC5VDlkX
— ALLWood Reviews (@AllwoodReviews) August 29, 2022
दिग्दर्शक पुरी जगन्नाथ (Director Puri Jagannath) यांचा ‘लायगर’ (Liger) हा चित्रपट दि. 25 ऑगस्ट रोजी अनेक भाषांमध्ये प्रदर्शित झाला. मात्र तरीही हा चित्रपट ‘बॉक्स ऑफिस’वर मोठा संघर्ष करत आहे. पहिल्या दिवशी चित्रपटाने चांगला व्यवसाय केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याची कमाई 50 टक्क्यांनी कमी झाली. तिसऱ्या दिवशी कमाईचे आकडे 60 टक्क्यांपर्यंत खाली आले आणि आता चौथ्या दिवशी त्याची स्थिती आणखीनच बिकट झाली आहे.
चौथ्या दिवशी अवघी ‘इतकी’ कमाई
भारत-पाकिस्तान सामन्याचा (India-Pakistan Match) चौथ्या दिवशी ‘लायगर’च्या संग्रहावरही परिणाम झाला आहे. रविवारपासून निर्मात्यांनाही मोठ्या आशा होत्या. पण, संध्याकाळी भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यामुळे निर्मात्यांची ही आशाही धुळीस मिळाली आहे. रिपोर्टनुसार, ‘लायगर’ने (Liger Collection) चौथ्या दिवशी जवळपास 5.50 कोटींचा व्यवसाय केला आहे. शनिवारीही या चित्रपटाने फारसा व्यवसाय केला नाही. शनिवारी या चित्रपटाने 6.95 कोटींचा व्यवसाय केला आहे.
Arrogant #VijayDevarakonda ‘s film #Liger down and dusted….time to focus now #BoycottBrahmastra #Liger Box Office collection. pic.twitter.com/68DkbR68TS
— Oxomiya Jiyori 🇮🇳(Modi’s Family) (@SouleFacts) August 28, 2022
‘लायगर’मध्ये दिग्गज कलाकारांची फौज
विजय देवरकोंडाने ‘लायगर’ या चित्रपटामध्ये फायटरची भूमिका साकारली आहे. चित्रपटामधीस विजयच्या फिटनेसचं अनेक जण कौतुक करत आहेत. अभिनेत्री अनन्या पांडेनं विजयच्या गर्लफ्रेंडची भूमिका साकारली आहे. तर राम्या कृष्णन यांनी विजयच्या आईची भूमिका साकारली आहे. रोनित रॉय (Ronit Roy), रम्या कृष्णन (Ramya Krishnan) आणि माईक टायसन (Mike Tyson) या कलाकारांनी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. ‘वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियन’ (World Boxing Champion) माईक टायसनचा ‘लायगर’ चित्रपटामधील कॅमिओ देखील चर्चेत आला आहे. या चित्रपटासाठी 5 संगीत दिग्दर्शकांनी मिळून, संगीत दिले आहे.
‘लायगर’ हा पॅन इंडिया चित्रपट पुरी जगन्नाथ यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाद्वारे विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. प्रसिद्ध माजी अमेरिकन बॉक्सर माईक टायसननेही (Famous former American boxer Mike Tyson) ‘लायगर’मध्ये काम केले आहे. माईक टायसनचा हा पहिला भारतीय चित्रपट आहे.