नाशिक l Nashik :
नाशकात (Nashik City) गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात वाढलेल्या गुन्हेगारीचे तणकट आता ग्रामीण भागामध्ये फोफावत असल्याचे समोर येत आहे. दरोडे (Robbery), खून (Murder), लुटपाट (Looting), चोऱ्या (Theft) याचा सुळसुळाट अविरत सुरु आहे.
अगदी क्षुल्लक गोष्टींसाठी कधी कोण कोणाच्या जिवावर उठेल हे सांगता येत नाही. त्यामुळेच अवैध शस्त्रांच्या (illegal weapons) चोरट्या व्यापारालाही खतपाणी मिळत आहे.
आता नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण पोलिसांनी (Nashik Rural Police) केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणात शस्त्रे सापडून आली आहे. हे पाहून खुद्द पोलिसही चक्रावून गेले असून, त्यांनी कारवाईत तीन संशयितांना बेड्या ठोकल्या आहे.
Fake Indian Currency Notes : अबब! तब्बल सात कोटींच्या बनावट नोटा जप्त; परराज्यातील टोळीचा पर्दाफाश
अशी करण्यात आली कारवाई (This is How Such action was taken)
जिल्ह्यातील सुरगाणा (Surgana) येथे काही जणांकडे अवैध शस्त्रसाठा असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. या माहित्याच्या आधारे पोलिसांनी संबंधितांची विचारपूस केली. तेव्हा त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसी खाक्या दाखवताच ते वठणीवर आले. त्यांच्याकडे देशी बनावटीचे तीन पिस्तुल (Three Desi hHandguns), तीन जिवंत काडतुसे (Three C artridges), एक एअरगण (One Airgun), एक चॉपर (Chopper), एक कोयता (Machete), अग्निशस्त्र (Firearm) अशी एकामागून एक प्राणघातक शस्त्रे सापडली. त्यामुळे पोलिसही अवाक झाले आहे. त्यांनी याप्रकरणी अंकेश एखंडे, श्याम पवार, आकाश भगरे या ती संशयितांना अटक केली आहे. त्यांची पुढील चौकशी कसून सुरू आहे.
एवढा मोठा शस्त्रसाठ्याची जमवाजमव कशासाठी ? (Why such a large stockpile of weapons?)
पोलिसांनी संशयितांची चौकशी सुरू केली आहे. त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा कशासाठी जमा केला. नेमके त्यांना काय करायचे होते, कुठे घातपाताचा डाव होता का, या शक्यता पडताळून पाहिल्या जात आहे.
मात्र, अवैध शस्त्रांची चोरटी वाहतूक आणि अवैध विक्रीमुळे पोलिसांसमोरील आव्हान वाढले आहे. सध्या कुणाजवळही शस्त्र सापडत आहे. कोणीही देशी कट्टा, पिस्तुलीच्या सहाय्याने पोलिसांवर देखील गोळीबार करू शकतो. हे लक्षात घेता त्यांनाही सावधिगिरीची पावले टाकावी लागतील. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी अधिक तपास सुरू केला आहे. त्यातून काय समोर येते पाहावे लागेल.
https://ekhabarbat.com/breaking-news-senior-social-activist-and-writter-anil-avchat-passes-away-pune/
आपण ह्या बातम्या वाचल्यात का?
20 तासांपासून हवेत लटकताहेत 48 जण; ड्रोननं अन्नपाण्याचा पुरवठा, बचावकार्य सुरु
Tomato Fever : सावधान! 'स्वाईन फ्लू'सोबत आता 'टोमॅटो फिवर'चा ही धोका वाढला; 'अशी...
Nashik Municipal Election 2022 : निवडणुकीचा धुराळा उडणार; नाशिक महापालिकेची 'अशी...
'फूल' बनू नका, 'फायर व्हा'! १ एप्रिलपासून बदलणार हे १० नियम; पटकन जाणून घ्या