बस पलटून भीषण अपघात, विद्यार्थ्यांसह 8 जणांचा मृत्यू; 20 जखमी

बस पलटून भीषण अपघात, विद्यार्थ्यांसह 8 जणांचा मृत्यू; 20 जखमी l Bus overturned eight dead and more than 20 critically injured Karnataka
बस पलटून भीषण अपघात, विद्यार्थ्यांसह 8 जणांचा मृत्यू; 20 जखमी l Bus overturned eight dead and more than 20 critically injured Karnataka
Share on Social Sites

बंगळुरु l Bangalore :

कर्नाटकात (Karnataka) एक मोठी दुर्घटना घडल्याचे वृत्त समोर आले आहे. तुमकूर जिल्ह्यातील (Tumkur District) पावागड जवळ (Pavagad) बस पलटी झाली आहे. (Major accident near Pavagadh, Tumkur District, Karnataka) या दुर्घटनेत आठ जण ठार तर 20 हून अधिक गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये काही विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. तुमकूर पोलिसांनी (Tumkur Police) या घटनेला दुजोरा दिला आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. प्राथमिक तपासानंतर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. बसमध्ये सुमारे 60 प्रवासी असल्याची माहिती आहे.

एका पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, 20 जखमींपैकी 8 जणांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृत आणि जखमींमध्ये काही विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.

दाभोळकरांच्या खुन्यांची ओळख पटली.. साक्षीदाराकडून महत्त्वाची साक्ष

याआधी मंगळवारी कर्नाटकातील विजयनगर जिल्ह्यातील बनवीकल्लू येथे राष्ट्रीय महामार्ग 50 वर एक वाहन उलटले. (National Highway 50, Banavikallu in Vijayanagar District, Karnataka) या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून 9 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये चार महिलांचा समावेश आहे. गाडीतील सर्व प्रवासी रामेश्वरमला (Rameshwaram) जात होते.

सावधान! जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढला; ‘अशी’ घ्या काळजी

गेल्या आठवड्यात कलबुर्गी (Kalburgi) येथेही कार झाडावर आदळल्याने अपघात झाला होता. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्वजण महाराष्ट्रातील अहमदनगर (Ahmadnagar) येथील रहिवासी होते. ते गंगापूर येथील दत्तात्रेय मंदिरातून परतत होते.

See also  Today’s Horoscope : जाणून घ्या आजचे पंचांग अन् राशी मंथन, सोमवार, 29 ऑगस्ट 2022

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?

See also  Today's Horoscope : जाणून घ्या आजचे पंचांग अन् राशी मंथन, शुक्रवार, 05 ऑगस्ट 2022

Share on Social Sites