पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात, पाच जणांचा जागीच मृत्यू, कारचा चक्काचूर l Pune-Mumbai Expressway major accident
Share on Social Sites
पुणे l Pune :
मावळ येथे जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर (Pune-Mumbai National Highway) शिलाटणे गावाजवळ (Shilatane village) कार आणि कंटेनर (Car and Container) यांच्यात भीषण (Pune Accident) अपघात झाला आहे. या अपघातात कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
या भीषण अपघातामुळे राज्यात एकच खळबळ उडाली असून यामध्ये कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. मुंबईहून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगात जाणारी फोर्ड गाडी (Ford Car Accident) पुण्याकडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या कंटनेरवर आदळल्याने हा अपघात घडला.
अपघाताची माहिती समजताच महाराष्ट्र सुरक्षा बल (Maharashtra Security Force), आयआरबी पेट्रोलिंग (IRB Patrollin), देवदूत यंत्रणा (Devdoot) आणि स्थानिक ग्रामस्त (Local Villager) तसेच पोलीस यंत्रणा (Police) यांनी घटनास्थळी धाव घेत कंटेनरखाली अडकलेली गाडी आणि मृत प्रवाशी यांना बाहेर काढले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अति वेगात असणाऱ्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने रस्त्याच्यामध्ये असणारे दुभाजक ओलांडून मुंबईच्या दिशेने जाणार्या कंटेनरखाली ही कार घुसली. यामुळे कार आणि कंटेनर यांच्यात भीषण अपघात झाला. यामध्ये कारमधील सर्वच म्हणजेच पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.