
पुणे l Pune :
राज्यभर पेपरफुटीचे सत्र सुरूच असून आता पुणे पोलिसानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी लष्कर विभागाचे दिल्लीतील बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचे जॉइंट डायरेक्टर राजेशकुमार दिनेशप्रसाद ठाकूर (Rajeshkumar Dineshprasad Thakur, Joint director of the Border Roads Organization, Delhi) यांना अटक केली.
जनरल रिझर्व्ह इंजिनिअर फोर्स (General Reserve Engineer Force) विभागासाठी ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी ही भरती पार पडली. यात चाळीस परीक्षार्थींना स्वतः पेपर सेट करणाऱ्या ठाकूर यांनीच पेपर पुरवले.
ठाकूर यांनी पेपर फोडण्यासाठी २५ लाख रुपयांची मागणी केली होती. मार्चमध्ये पेपर तयार करण्यात आला. तर ३१ ऑक्टोबर २०२१ मध्ये ही परीक्षा पार पडली होती. सुरुवातीला ३६ परीक्षार्थींना पेपर पुरवल्याच समोर आले होते.
असा झाला व्यवहार
ठाकूर यांनी पुणे विमानतळावर ९ लाख रुपये स्वीकारले. तर मुलाच्या खात्यावर ५ लाख रुपये पाठवले. हार्वर्ड विद्यापीठात (Harvard University) त्यांचा मुलगा शिकत आहे. या गुन्ह्यात पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश (Commissioner of Police Krishnaprakash) यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली.
Kirti Shiledar : ज्येष्ठ गायिका आणि संगीत नाटक कलाकार कीर्ती शिलेदार यांचे निधन
आपण ह्या बातम्या वाचल्यात का?
Today's Horoscope : जाणून घ्या आजचे तुमचे राशी मंथन अन् पंचांग, गुरुवार, 04 ऑगस्...
नवजोत सिद्धू यांना ‘सुप्रीम’ झटका; सुनावली सश्रम कारावासाची शिक्षा, वाचा नेमकं क...
Video : खासगी रुग्णालयात भीषण आग; 10 जणांचा होरपळून मृत्यू
शुल्लक कारणावरून मुख्याध्यापकाची विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण; नाशकातील स्कॉटीश...