पुणे l Pune :
ज्येष्ठ गायिका आणि संगीत नाटक कलाकार कीर्ती शिलेदार यांचे आज निधन झाले आहे. (Veteran singer and musical artist Kirti Shiledar has passes away) त्या 70 वर्षांच्या होत्या. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना आज शनिवारी (दि. २२) रोजी उपचारासाठी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात (Dinanath Mangeshkar Hospital, Pune) दाखल करण्यात आले होते. त्या ठिकाणी उपचार दरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. मागील काही महिन्यांपासून त्यांच्यावर डायलेसीसचे उपचार सुरु होते.
वयाची साठ वर्षे रंगभूमीसाठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक-अभिनेते जयराम शिलेदार (veteran singer-actor Jayaram Shiledar) व अभिनेत्री जयमाला शिलेदार (Actress Jaymala Shiledar) यांच्या त्या कन्या होत्या. वयाच्या दहाव्या वर्षी कीर्ती शिलेदार यांनी रंगभूमीवर पहिले पाऊल ठेवले होते.
त्यांनी संगीत कान्होपात्रा (Sangeet Kanhopatra), ययाती (Yayati) आणि देवयानी (Devyani), संशय कल्लोळ (Sanshay Kallol), स्वयंवर (Swayamvar), संगीत सौभद्र (Sangeet Saubhadra), मृच्छ कटिक (Mritch Katik), मंदोदरी (Mandodari), एकच प्याला (Ekach Pyala)या सारख्या नाटकांना कीर्ती शिलेदार यांचा सूर मिळाला होता.अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे (All India Marathi Natya Sammelan) अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.
कलावंत म्हणून तर कीर्ती शिलेदार मोठ्या होत्याच, पण त्यांनी जपलेलं माणूसपणही भावणारं होतं.
समस्त पुणेकरांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली !#कीर्ती #शिलेदार #KirtiShiledar
— Murlidhar Mohol (Modi Ka Parivar) (@mohol_murlidhar) January 22, 2022
नाटकांचे 4000 हून अधिक प्रयोग (More than 4000 plays she performed)
कीर्ती शिलेदार यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (Savitribai Phule Pune University) त्यांनी साहित्य शाखेच्या पदवी घेतली होती. त्यांची भूमिका असलेल्या नाटकांचे आजवर 4000 हून अधिक प्रयोग झाले आहे. देशातल्या मराठी रसिकांसाठीही त्यांनी देशाच्या विविध शहरांत मराठी संगीत नाटकांचे प्रयोग केले. संगीत कान्होपात्रासह जुन्या नाटकातल्या गाण्यांचा गोडवा त्यांनी नव्या पिढीपर्यंत पोहोचवला. बालगंधर्वांच्या (Bal Gandharva) सुवर्ण युगाची आठवण यावी, अशा एकरूपतेने कीर्ती शिलेदार यांनी गायलेली गीते रसिकांनी डोक्यावर घेतली.
Aftab Ahmed Khan : मुंबई ATSची स्थापना करणारे पूर्व IPS अधिकारी ए. ए. खान कालवश