कीव l Kyiv :
युक्रेन आणि रशियामधील (Ukraine and Russia War Update) युद्धाचा आज (दि. 29) 34वा दिवस आहे. रशियाकडून वारंवार होणाऱ्या हल्ल्याने युक्रेन आता पार हैराण झाले आहे. अनेक शहरे होत्याची नव्हती झाली आहे. पण युक्रेनच्या मारियुपोलमध्ये (Mariupol) सर्वात मोठी शोकांतिका घडली आहे.
वृत्तानुसार, या शहरात रशियन हल्ल्यात (Russian Attack) तब्बल 5 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. हजारो लोक बेघर झाले आहे. रुग्णालये जखमींनी गच्च भरलेली आहे.
مبنى المحافظة في ماريوبول
Mariupol regional administration building#Ukraine🇺🇦 https://t.co/gEPTIpqOCl— 🇵🇸الأمير ياسين 🇵🇸 (@M86950933) March 29, 2022
सद्यपरिस्थिती अशी आहे की, उद्यान आणि शाळांमध्ये मृतांचे दफन केले जात आहे. रशियाने इथे एवढा विध्वंस केला आहे की, 90 टक्के इमारती भग्नावस्थेत बदलल्या आहे. तर 40 टक्के इमारती अशा आहेत की त्या पूर्णपणे जमिनीदोस्त आहे.
मारियुपोल (Mariupol) आहे ज्यामध्ये रशियाने पहिल्यांदा युद्धविराम जाहीर केला होता. युद्धात अडकलेल्या लोकांना येथून बाहेर काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्यासाठी मानवी कॉरिडॉर बांधण्यात येणार आहे. सुरक्षित रस्ता उपलब्ध करून दिला जाईल जेणेकरुन लोकांना येथून सहज बाहेर पडता येईल.
पण संपूर्ण घटना उलटी घडली. कारण या शहरात रशियन सैनिक रस्त्यावर उतरले आणि लोकांवर अंदाधुंद हल्ले केले. रशियन विमानांनी इतके हवाई हल्ले केले की, घरांमधून धूर निघताना दिसत आहे.
This is 11-year-old Milena from Mariupol. She was shot in her face at a Russian checkpoint. On the second photo also Milena a week later. The girl is much better and wants to return to gymnastics. CNN came to hospital and made a report about her#RussianWarCrimes pic.twitter.com/twcI6fdFXw
— Oleksandra Matviichuk (@avalaina) March 28, 2022
उद्यान आणि शाळांमध्ये मृतदेह पुरले जात आहे (Bodies are being buried in parks and schools)
युक्रेनने मारियुपोलच्या विध्वंसाची तुलना सीरियातील अलेप्पोशी (Aleppo, Syria) केली. त्यामुळे मृतांना स्मशानभूमीत नेणे कठीण होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे उद्यान आणि शाळांमध्ये मृतदेह पुरले जात आहे. त्याच वेळी, मारियुपोलमधील दळणवळण सेवा देखील ठप्प झाली आहे. लोकांना त्यांच्या कुटुंबीयांशी बोलता येत नाही. कोणत्याही प्रकारच्या माहितीसाठी लोकं सोशल मीडियावर अवलंबून आहे.
Russia-Ukraine War : धक्कादायक! युक्रेन-पोलंड सीमेवर भारतीय विद्यार्थ्यांना बेदम मारहाण
केवळ लष्करी तळच नाही तर निवासी भागांनाही केले लक्ष्य (Targeted not only military bases but also residential areas)
युद्धाच्या सुरुवातीला रशियाने कीवला लक्ष्य केले. सतत हल्ले होत होते. केवळ लष्करी तळांना लक्ष्य करणार असल्याचे सांगण्यात आले. पण रशियन सैन्याने (Russian forces) केवळ लष्करी तळच नव्हे तर निवासी भागांनाही लक्ष्य केले. कीवनंतर खार्किवची (Kharkiv) वेळ आली, तिथे रशियाने अंदाधुंद हल्ला केला. या हल्ल्यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले, पण सर्वात धोकादायक दृश्य मारियुपोलचे होते.
Пидарасы… вас Бог накажет за все Mariupol, Russians commit genocide of the Ukrainian population ////Маріуполь, росіяни проводять геноцид українського населення //// #putinstop pic.twitter.com/ev2RkiLZ8g
— Dobryi (@Dobruy) March 29, 2022
रशियन सैनिकांची एका शहरातून दुसऱ्या शहरात आगेकूच (Russian troops roaming from one city to another)
मारियुपोलमध्ये रशियाने शहराला राजधानी कीवशी जोडणारा पूल नष्ट केला. जसजसे युद्ध वाढत गेले, तसतसे रशियन सैन्याने एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवेश केला आणि कहर केला. मारियुपोलच्या महापौरांच्या प्रवक्त्याने सांगितले की, आम्ही आमचे 5000 लोक गमावले आहे. हसणारे-खेळणारे शहर उद्ध्वस्त झाले आहे. येथील परिस्थिती अत्यंत वाईट आहे. 90 टक्के इमारती पडक्या झाल्या आहे.
मारियुपोलला वाचवणे प्रचंड अवघड (Mariupol is hugely difficult to save)
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Ukraine’s President Volodymyr Zelensky), रशियाच्या हल्ल्याशी झुंज देत अलीकडे म्हणाले की, अतिरिक्त टँक आणि विमानांशिवाय मारियुपोल वाचवणे अशक्य आहे. युक्रेन रशियन क्षेपणास्त्रे शॉटगन आणि मशीन गनने मारू शकत नाही. म्हणूनच आवश्यक शस्त्रास्त्रांसाठी आम्ही बराच काळ वाट पाहत होतो.
A #Russian tank was shot in #Mariupol. pic.twitter.com/Z9JPOdIQ9d
— Dailynews Viral (@dailynewsceo) March 29, 2022