पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचं सत्र सुरुच; जाणून घ्या आजचे दर

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचं सत्र सुरुच; जाणून घ्या आजचे दर l Petrol Diesel price Hike Season continues today the price hike again
पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचं सत्र सुरुच; जाणून घ्या आजचे दर l Petrol Diesel price Hike Season continues today the price hike again
Share on Social Sites

नवी दिल्ली l New Delhi :

भारतीय तेल कंपन्यांनी (Indian oil companies IOCL) आज पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या दरांत वाढ केली आहे. (Petrol Diesel Price Hike) आजचे वाढलेले पेट्रोल-डिझेलचे (Petrol-Diesel) नवे दर जारी करण्यात आले आहेत. आज पेट्रोलच्या दरांत 84 पैसे प्रति लिटर, तर डिझेलच्या दरांत 74 पैशांची वाढ झाली आहे.

आजच्या दरवाढीनुसार, मुंबईत पेट्रोलच्या दरांत (Mumbai Petrol Rate) प्रति लिटर 84 पैशांची तर डिझेलच्या दरांत 74 पैशांची वाढ झाली आहे. यानुसार मुंबईत पेट्रोलसाठी 114.98 रुपये एका लिटरसाठी मोजावे लागतील. याचप्रमाणे डिझेलसाठी 99.19 रुपये द्यावे लागतील. देशाची राजधानी दिल्लीत (New Delhi Petrol Rate) पेट्रोल 100.21 रुपये आणि डिझेल 91.47 रुपयांवर पोहोचले आहे.

‘फूल’ बनू नका, ‘फायर व्हा’! १ एप्रिलपासून बदलणार हे १० नियम; पटकन जाणून घ्या

गेल्या 7 दिवसांत तेलाच्या किमतीत झालेली ही सहावी वाढ आहे. तेल कंपन्यांनी 22 मार्चपासून (24 मार्च वगळता) पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करणे सुरूच ठेवले आहे. अशाप्रकारे सात दिवसांत पेट्रोल 4.40 रुपयांनी महागले आहे. तर डिझेल 4.55 रुपयांनी महागले आहे.

देशातील इतर शहरांची काय स्थिती आहे?

कोलकात्यात (Kolkata Petrol Rate) आज पेट्रोलचा दर 108.01 रुपये प्रति लिटरवरून 108.53 रुपयांवर पोहोचले आहे. तर कोलकात्यात (Chennai Petrol Rate) डिझेल 93.57 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. चेन्नईबद्दल बोलायचे झाले तर, आज एक लिटर पेट्रोल 104.43 रुपये प्रति लिटरवरून 104.90 रुपयांवर पोहोचले आहे. तर डिझेल 95.00 रुपये प्रति लिटरने मिळत आहे.

क्या बात हैं.. आता WhatsApp वरुनही चित्रपट, वेबसिरिज पाठवता येणार

पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price) कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचे Indian Oil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx वर देखील पेट्रोल डिझेलचे दर सोप्या पद्धतीने पाहता येतील. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल.

See also  मोठी बातमी : 'या' कारणामुळे मंत्री बच्चू कडू यांना दोन महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?

See also  Corona Vaccine : आता २ ते ६ वर्षांच्या मुलांना लवकरच मिळणार Corona ची लस

Share on Social Sites