
जळगाव l Jalgaon :
‘पाळणा’ हा प्रत्येक आईचा आणि बाळाचा जिव्हाळ्याचा विषय. बाळ पाळण्यात टाकलं कि लागलीच झोपी जातात. मात्र हाच पाळणा दोन चिमुकल्यांच्या जीवावर उठला आहे.
लहान भावाला झोका देत असताना अचानक सिमेंटचा खांब डोक्यात पडल्यामुळे 6 महिन्यांचा तेजस व 9 वर्षाची प्राची या बहिण भावांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना खान्देशातील जळगाव (Jalgaon) येथे घडली आहे.
खान्देश हादरले.. ब्युटी पार्लर चालक महिलेवर बलात्कार; Facial साठी हॉटेलवर बोलावून..
विजय घुक्से (Vijay Ghukse) हे शेतकरी पुसद येथील महावीर नगर (Mahavir Nagar, Pusad) येथे राहतात. विजय यांना 4 अपत्य आहेत मात्र आज घुक्से परिवार एका पाळण्यामुळे शोकाकुल आहे. घुक्से यांचे लक्ष्मीनगर (Laxminagar) येथे शेत आहे.
याच शेतात प्राचीचे वडील विजय घूक्से हे गाजर काढण्याचे काम करीत होते. तर आई सारिका (Sarika Ghukse) ही सहा महिन्याच्या तेजस (Tajas Ghukse) या बाळाला साडीने बांधलेल्या पाळण्याने झोका देत होती.
सकाळी 11 वाजता प्राची घूक्से (Prachi Ghuske) ही शाळा आटोपून शेतात आली. भूक लागल्याने आईला जेवण देण्याची विनंती केली. मात्र आईने तेजसला झोका दे! असे म्हणून पाणी आणण्यासाठी घरात गेली.
तितक्यात सिमेंटने निर्मित निकृष्ट दर्जाचा खांब अचानक तुटून प्राचीच्या थेट डोक्यावर आदळला, त्यामुळे प्राची जागीच बेशुद्ध झाली. तर बाळ तेजस हा जोरात बाजूला फेकल्या गेला.
आई सारिका ही पाणी घेऊन बाहेर आल्यावर संपूर्ण प्रकार बघितला. आरडाओरड केली. वडील विजय यांनी दोन्ही चिमुकल्यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात उपचारार्थ नेले. मात्र डॉक्टरांनी प्राचीला मृत घोषित केले तर तेजसला नांदेड (Nanded) येथे हलवण्यात आले होते मात्र वाटेतच त्याचीही प्राणज्योत मालवली.
दोन्ही चिमुकल्याच्या मृत्यूमुळे गावात प्रचंड हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली आहे.
काय सांगताय! होय, तुम्ही कोणाशी आणि किती वेळ बोलता Google या Apps द्वारे चोरी करतोय डेटा