
पंजाब l Punjab :
पंजाबमधील जालंदर जिल्ह्यात (Jalandhar district) आंतरराष्ट्रीय कबड्डीपटूची आज सोमवारी (ता. १४) गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. जालंदरच्या शाहकोटमध्ये अज्ञात व्यक्तीने संदीप नांगल आंबिया (Sandeep Nangal Ambia shoot dead) याच्यावर सामन्या दरम्यान गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्याला जखमी अवस्थेत रुग्णालयात नेले असता उपचारा दरम्यान मृत्यू झाला. गोळीबारानंतर घटनास्थळी चेंगराचेंगरी झाली.
रिपोर्ट्सनुसार, जालंदरच्या (Jalandhar) मालियन गावात कबड्डी चषका दरम्यान अज्ञात हल्लेखोरांनी संदीप नांगल आंबिया (Sandeep Nangal Ambia) याच्यावर गोळ्या झाडल्या. गोळी त्याच्या डोक्यात आणि छातीत लागली. संदीप याला गोळी लागल्याने घटनास्थळी चेंगराचेंगरी झाली. घटनेची माहिती मिळताच मोठ्या संख्येने पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला होता.
International Kabaddi player Sandeep nangal Ambia hv been murdered at malhiya Kabaddi tournament .
World hv been significantly revolutionised, people being Educated worldwide , earning Ample money, bt there are some people still can't tolerate others Success 👎#RIP champ— Mąñďěêp Jóśåñ ( ❤ A sophomaniac ❤ ) (@ManJosann) March 14, 2022
मलियन कलान गावात (Malian Kalan village) कबड्डी स्पर्धा (Kabaddi competition) सुरू होती. यावेळी संदीप त्याच्या काही साथीदारांना सोडण्यासाठी बाहेर गेला होता. कबड्डी स्पर्धेच्या सामन्या दरम्यान अचानक अंदाधुंद गोळीबार सुरू झाला.
गोळीबारात संदीप नांगर अंबिया (Sandeep Nangal Ambia) याला गोळ्या लागल्या. हे पाहून उपस्थितांमध्ये चेंगराचेंगरी झाली. कोणाला काही समजण्यापूर्वीच गोळीबार करणारे घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले.
WWE शोकसागरात! ‘या’ दिग्गज रेसलरचे निधन; ३ वेळा आला होता ‘हार्ट अटॅक’