नवी दिल्ली l New Delhi :
गुगल अँड्रॉइड युजरच्या (Google Android User) प्रायव्हसीसंबंधी समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचे नेहमी सांगितले जाते. तर दुसरीकडे आता एका रिसर्चमध्ये गुगलबाबत एक वेगळाच खळबळजनक दावा करण्यात आला आहे. गुगल, गुगल डायलर आणि मॅसेजेस (Google Dialer and Messages) सारख्या Apps वरुन युजर्सच्या परवानगीशिवाय त्यांचा डेटा मिळवत असल्याचा दावा रिसर्चमध्ये करण्यात आला आहे.
हे दोन Apps अँड्रॉइड फोनवर प्री-इन्स्टॉल (Android phone Pre installed Apps) केलेले आहेत. “What Data Do The Google Dialer and Messages Apps on Android Send to Google?” अशा टायटलसह या रिसर्चमध्ये गुगल डेटा मिळवत असल्याचा दावा करण्यात आला आहे. या रिसर्चमध्ये हे Apps युजरच्या कोणत्याही परवानगीशिवाय त्यांचा डेटा गुगलला पाठवत असल्याचे म्हटले आहे. ट्रिनिटी कॉलेज मधील डग्लस लेथ (Douglas Leith, Trinity College) या एका कंप्यूटर सायन्स प्रोफेसरने (computer science professor) हे रिसर्च केले आहे.
Viral Video : कारची चावी कारमध्येच राहिली तर काय करावे… पाहा हा ‘देसी जुगाड’
रिपोर्ट्सनुसार, Google युजरचा असा डेटा गोळा करत आहे ज्यात SHA26 hash of Messages असा हॅश स्वरुपातील मेसेज, टाईमस्टॅम्प्स (Timestamps), कॉन्टक्ट डिटेल्स (Contact Details), इनकमिंग आणि आउटगोइंग कॉल लॉग्स (Incoming and Outgoing call logs), कॉलचा कालावधी अशा गोष्टींचा समावेश असल्याचा दावा Douglas Leith यांनी केला आहे.
गुगलने डेटा हॅश मेसेज स्वरुपात गोळा केला तरी त्या हॅश कंटेंटमधील मेसेज जाणून घेतला जातो असेही Leith यांनी सांगितले. त्याशिवाय गुगलने Google Dialer and Messages Apps साठीचा डेटा गोळा करण्यासाठी प्रायव्हसी पॉलिसी देणं अतिशय शांतपणे टाळलं असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. अशाप्रकारे प्रायव्हसी पॉलिसी देणे टाळणे हे नियमांचे उल्लंघन असल्याचेही ते म्हणाले.
Blog (विशेष लेख) : कसयं ना शेठ… 16 ते 18 वर्षाच्या ‘रिल्स स्टार’ची जिंदगी
Douglas Leith यांनी मागील वर्षी हा अभ्यास, हे रिसर्च केले होते. त्यानंतर त्यांनी या Apps बाबत आढळलेल्या प्रायव्हसीसंबंधी त्रुटी किंवा इतर बाबींची माहिती Google ला दिली. प्रायव्हसीबाबतच्या अशा त्रुटी टाळण्यासाठी काही महत्त्वाचे बदल करण्याचंही त्यांनी गुगलला सुचवले होते. तसेच गुगलला Google Dialer and Messages Apps वरुन डेटा मिळवण्याची कारणे स्पष्ट करण्याचेही त्यांनी सांगितले होते.
Google ने यावर स्पष्टीकरणही दिले आहे. या स्पष्टीकरणात गुगलने हॅश मेसेज सिक्वेन्सिंग बग शोधण्यासाठी गोळा केले जात असल्याचे म्हटले आहे. तर कॉल लॉग्स RCS या मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर पाठवण्यात येणाऱ्या OTP चे ऑटोमेटिक डिटेक्शन सुधारण्यासाठी घेतले जात असल्याचे गुगलने स्पष्ट केले होते.
आपण ह्या बातम्या वाचल्यात का?
पेपरफुटीचे सत्र सुरूच : Vehicle Mechanic पदाच्या भरती परीक्षेचा पेपर फुटला; BRO ...
Video : अभी तो पार्टी शुरू हुई हैं... देशवासियांच्या दुःखाचा पाढा वाचून मोदींवर ...
एसटी बस पुल तोडून नर्मदा नदीत कोसळली.. 12 प्रवाशांचे मृतदेह सापडले, 25 प्रवाशी ब...
चर्चा तर होणारच! पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री ठाकरे उद्या एकाच मंचावर; यापूर्व...