‘जय महाराष्ट्र’ म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा अखेर राजीनामा

'जय महाराष्ट्र' म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा अखेर राजीनामा l Uddhav Balasaheb Thackeray resigns as a Chief Minister of Maharashtra
'जय महाराष्ट्र' म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा अखेर राजीनामा l Uddhav Balasaheb Thackeray resigns as a Chief Minister of Maharashtra
Share on Social Sites

मुंबई l Mumbai :

महाराष्ट्रातील राजकारणात घडामोडींनी वेग धरला आहे. विधानपरिषदेची निवडणूक (Legislative Council elections) संपली आणि राजकीय नेत्यांचे रस्ते रातोरात बदलले. शिवसेनेत (Shiv Sena) मोठी फूट पडली आणि आता पर्यायाने सरकार पडणार, हे स्पष्ट झालंय. (Chief Minister Uddhav Thackeray News)

https://twitter.com/rautsanjay61/status/1542194149050535937

या दरम्यान महाविकास आघाडीतही बैठकींचं सत्र सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने मंत्रीमंडळाची बैठक बोलावली असून सर्व मंत्री उपस्थित होते. उद्या (दि. 29) होणाऱ्या बहुमत चाचणीपूर्वी मंत्रीमंडळाची ही शेवटची कॅबिनेट ठरली. आजच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे (Uddav Thackeray) मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. (Maharashtra Political Crisis LIVE)

https://twitter.com/ANI/status/1542182164908765187

कोर्टाच्या निर्णयानंतर ठाकरे यांनी महाराष्ट्राला संबोधन करत मोठा निर्णय घेतला. मी मुख्यमंत्रीपदाचा त्याग करत असल्याचं त्यांनी म्हटलं. मागील दोन दिवसांपासून घडामोडी वायूवेगाने पुढे सरकल्या. सत्ताधारी आणि विरोधकांच्या गोटात हालचाली होऊ लागल्या. (Uddhav Balasaheb Thackeray resigns as a Chief Minister of Maharashtra)

ठाकरे सरकारची ‘अग्निपरीक्षा’! उद्याच बहुमत सिद्ध करा, राज्यपालांचे आदेश; एकनाथ शिंदे उद्या मुंबईत येणार, ‘बॅगा पॅक करुन तयार रहा’ शिंदेंच्या सूचना

प्रकृती स्थिर होताच यामध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी उडी घेतली. यानंतर महाविकास आघाडी सरकारला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न होत आहे. त्यातच आकड्यांचं समीकरण साधता न आल्याने शिवसेनेला (Shivsena) सत्ता सोडावी लागणार असल्याचं निश्चित झालं आहे. (MVA Government News)

आजच्या कॅबिनेट बैठकीसाठी मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Avhad), नितीन राऊत (Nitin Raut), अस्लम शेख (Aslam Shaikh), बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), विश्वजीत कदम (Vishwajit Kadam), अशोक चव्हाण (Ashok Chavan), अमित देशमुख (Amit Deshmukh), के. सी. पाडवी (K C Padavi) आणि सुनील केदार (Sunil Kedar) पोहोचले होते. (Uddhav Thackeray Resigns as Chief Minister)

https://www.facebook.com/nitinnandgoankar/videos/568314097996168/

See also  ऐतिहासिक निर्णय! अविवाहित महिलेला 24 आठवड्यांच्या गर्भपातास परवानगी

सर्वोच्च न्यायालयात दणका

राज्यपालांनी बहुमत चाचणी तत्काळ घेण्याचे निर्देश दिल्यानंतर शिवसेसेने सर्वोच्च न्यायालयाचा (Supreme Court) दरवाजा ठोठावला. राज्यपालांच्या निर्णयावर आक्षेप घेत सेनेच्या वतीने काही महत्वाचे मुद्दे मांडण्यात आले. सुप्रीम कोर्टात या प्रकरणावर सुनावणी सुरू झाली. राज्यपालांची बाजू मांडणारे महान्यायअभिकर्ता तुषार मेहता (Tushar Mehta), बंडखोर आमदारांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील नीरज किशन कौल (Senior lawyer Neeraj Kishan Kaul) व शिवसेनेच्या (Shivsena Latest news) मनु संघवी (Manu Sanghavi) यांनी आपापली बाजू मांडली. (Maharashtra Political Crisis)

शिवसेनेची शेवटची अपेक्षा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने संपली आहे. साडेतीन तास युक्तीवाद झाला आणि यानंतर अखेर निर्णय समोर आला आहे. बहुमत चाचणी रोखण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे मविआ सरकारला उद्या अग्निपरिक्षेला सामोरं जावं लागणार असल्याचं स्पष्ट झालंय. याआधीच मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला आहे.

https://twitter.com/ANI/status/1542180028917510145

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

  • येवढे वर्षे आम्ही बोलत होतो पण आम्ही शेतकऱ्यांनी कर्जमुक्त केलं आहे.

  • स्वत: शिवसेनाप्रमुखांनी जे नाव ठेवलं ते नाव आपण संभाजीनगरला  (Sambhajinagar)दिलं आहे.

  • पुढची वाटचाल सगळ्यांच्या आशिर्वादाने सुरू राहील. नामांतरावरून मला आनंद वाटला.

  • एखादी गोष्ट चांगली सुरू असली की त्याला दृष्ट लागते.

  • मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवेसनेचे 4 मंत्री उपस्थित होते. ज्यांना मोठं केलं ते आज विसरले. शिवसेना काय आहे. ते अनुभवत आलोय.

ठाकरे सरकारचा ‘मास्टरस्ट्रोक’; मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारचे ‘हे’ 10 मोठे निर्णय

  • साधी साधी माणसं आम्हाला प्रोत्साहन देत राहिली. ज्यांना दिलं ते नाराज आहेत, ज्यांना नाही दिलं ते खूष आहेत.

  • बाळासाहेबांनी अनेकांना मोठं केलं आहे.

  • कोर्टाने निर्णय दिला आहे, आता न्यायालयाचा मान राखला पाहिजे, उद्या बहुमताला सामोरं जावं लागणार आहे, लोकशाहीचं पालन झालंच पाहिजे.

https://twitter.com/forthright___/status/1542184173707833344

  • लोकशाहीचा मान राखल्याबद्दल राज्यपालांचे आभार मानतो

  • काँग्रेसच्या अशोक चव्हाणांनी (Congress Ashok Chavan) पण बैठकीनंतर सांगितलं की तुम्ही नाराज होवू नका आम्ही तुम्हाला बाहेरून पाठिंबा देतो.

  • केंद्राच्या सूचनेवरून मुंबईत सुरक्षा वाढवली जातेय. उद्या चीन सीमेवरील सुद्धा सुरक्षा मुंबई येईल याची लाज वाटते. एवढी लाज सोडली.

  • उद्या लोकशाही जन्माला येतीय. त्याचा पाळणा हलतोय.

https://twitter.com/Patil96Prashant/status/1542184587467816960

  • उद्याच्या शिवसैनिकांना कुणीही आडवं येवू नये. तुम्हाला कोणीही अडवणार नाही.

  • उद्या शिवसेनाप्रमुखाच्या पोराला मुख्यमंत्रीपदावरून खाली खेचण्याचं पुण्य त्यांना लाभणार आहे. मला पद जाण्यातची खंत अजिबात नाही, बहुमतामध्ये मला रस नाही.

  • मी आज मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत आहे. तसेच विधानपरिषद सदस्यत्वाचा सुद्धा राजीनामा देत आहे.

तयारीला लागा! राज्यात 7,231 पदांसाठी पोलीस भरती होणार; राज्य मंत्रिमंडळाचा हिरवा कंदील

See also  नोकराचा प्रताप! मालकाचे ४० लाख रुपये चोरून गृहकर्जाचे हप्ते मुदतीआधीच भरले

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?

See also  थरार : ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर 'तो' बिबट्या जेरबंद

Share on Social Sites