ठाकरे सरकारचा ‘मास्टरस्ट्रोक’; मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारचे ‘हे’ 10 मोठे निर्णय

ठाकरे सरकारचा 'मास्टरस्ट्रोक'; मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारचे 'हे' 10 मोठे निर्णय l 10 Major Decisions Taken by Thackeray Government in Cabinet meeting Mumbai
ठाकरे सरकारचा 'मास्टरस्ट्रोक'; मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारचे 'हे' 10 मोठे निर्णय l 10 Major Decisions Taken by Thackeray Government in Cabinet meeting Mumbai
Share on Social Sites

मुंबई l Mumbai :

आज (दि. 29) राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने बैठक घेत अनेक निर्णय घेतले आहेत. त्यामध्ये औरंगाबादचे (Aurangabad) नाव संभाजीनगर (Sambhajinagar) आणि उस्मानाबादचे (Osmanabad) नाव धाराशिव (Dharashiv) करण्यास मंजूरी देण्यात आली आहे. त्याचबरोबर बैठकीत सरकारने अनेक निर्णय तर अनेक प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली आहे. यामध्ये वेगवेगळ्या विभागाच्या दहा निर्णयाचा सामावेश आहे. (Maharashtra Cabinet today Meeting 10 Major Decisions)

‘जय महाराष्ट्र’ म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा अखेर राजीनामा

कॅबिनेटच्या या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी (CM Udhhav Thackeray) सोडून गेलेल्या आमदारांचे आभार मानत आत्तापर्यंत साथ दिल्याबद्दल आभारी आहे असं म्हटलं आहे. तसेच मला माझ्या सहकाऱ्यांनी धोका दिला असं म्हणत त्यांनी उरलेले निर्णय पुढच्या बैठकीत घेण्यात येतील असं सांगत सर्वांचा निरोप घेतला आहे. (10 Major Decisions Taken by Mahavikas aghadi Government in Cabinet meeting Mumbai)

आज दि. 29 जून 2022 मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय थोडक्यात पाहुयात

औरंगाबाद शहराच्या ‘संभाजीनगर’ (Sambhajinagar) नामकरणास मान्यता.

(सामान्य प्रशासन विभाग)

उस्मानाबाद (Osmanabad) शहराच्या “धाराशीव” (Dharashiv) नामकरणास मान्यता.

(सामान्य प्रशासन विभाग)

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे (Navi Mumbai International Airport) लोकनेते स्वर्गीय दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ (D B Patil International Airport) या नामकरणास मान्यता.

(नगर विकास विभाग)

राज्यासाठी हळद संशोधन व प्रक्रिया धोरण (Turmeric research and processing policy) लागू करणार. हिंगोली जिल्ह्यात (Hingoli district) मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र (Hon. Balasaheb Thackeray Haridra (Turmeric) Research and Training Center) स्थापन करणार.

(कृषि विभाग)

ठाकरे सरकारची ‘अग्निपरीक्षा’! उद्याच बहुमत सिद्ध करा, राज्यपालांचे आदेश; एकनाथ शिंदे उद्या मुंबईत येणार, ‘बॅगा पॅक करुन तयार रहा’ शिंदेंच्या सूचना

कर्जत (जि. अहमदनगर) (Karjat (District Ahamadnagar) येथे दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) न्यायालय स्थापन करणार

(विधि व न्याय विभाग)

अहमदनगर-बीड -परळी वैजनाथ या नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या (Ahmednagar-Beed-Parli Vaijnath new railway line project) सुधारित खर्चास मान्यता व त्यासाठी राज्य शासनाचा हिस्सा देणार

(परिवहन विभाग)

ग्रामीण भागातील विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना (Krantijyoti Savitribai Phule Gharkul Yojana) राबवणार.

(इतर मागास बहुजन कल्याण विभाग)

विदर्भ विकास मंडळ (Vidarbha Vikas Mandal), मराठवाडा विकास मंडळ (MarathvadaVikas Mandal) व उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळ (Maharashtra Vikas Mandal) ही विकास मंडळे पुनर्गठीत करण्याचा निर्णय.

(नियोजन विभाग)

निवड झालेल्या परंतु मराठा आरक्षण रद्द झाल्याने नियुक्ती न मिळालेल्या एसईबीसी (SEBC) उमेदवारांकरिता अधिसंख्य पदे निर्माण करण्यासाठी विधेयक मांडण्याचा निर्णय

(सामान्य प्रशासन विभाग)

शासन अधिसुचना दि. 8 मार्च 2019 अनुसार आकारावयाच्या अधिमुल्याची रक्कम भरण्याच्या कालावधीस मुदतवाढ देण्याचा निर्णय.

(महसूल विभाग)

दरम्यान, समांतरपणे महाविकास सरकारला उद्या बहुमत सिद्ध करण्याचे पत्र राज्यपालाने पाठवले असून त्यावर शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. कोर्टाच्या या निर्णयानंतर सरकारला उद्या बहुमत सिद्ध करावे लागणार का नाही हे स्पष्ट होणार आहे.

See also  शिंदें ऐवजी माझ्यासोबत चर्चा करा.. उद्धव यांचा फडणवीसांना फोन; मोदी-शाह नॉट रिचेबल

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?


Share on Social Sites