
नाशिक l Nashik :
नाशिक येथील (Nashik) शेंडीच्या डोंगरावर ट्रेकिंगसाठी (Shendi Hill Trekking) आलेल्या दोन तरुणांचा तोल जाऊन सुमारे एकशे वीस फूट खोल दरीत पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
डोंगरावरुन खाली पडल्यामुळे या तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर यातील एक तरुण जखमी झाला असून ट्रेकिंग करणारे इतर १२ जण सुखरूप आहे. या घटनेनंतर नाशिक जिल्हा (Nashik District) हादरला असून रापली (Rapali), कातरवाडी (Katarvadi), मनमाड शहरातील (Manmad) तरुणांनी रेस्क्यू ऑपरेशन करत सर्वांना सुखरूप पायथ्याशी आणण्यात यश मिळवले.
माहितीनुसार, अहमदनगर (Ahmednagar) येथील असलेले इंद्रप्रस्थ ट्रेकर्स (Indraprastha Trekkers group) या ग्रुपचे एकूण १५ सदस्य मनमाड शहराजवळ असलेल्या हडबीची शेंडी (Hadbichi Shendi), थमसप (Thams Up) म्हणून प्रसिद्ध असलेल्या शेंडीच्या डोंगरावर ट्रेकिंगसाठी आले होते. या ग्रुपमध्ये ८ मुली तर ७ मुले होते. यातील मुलांमध्ये दोन जण सराईत ट्रेकर होते.
Nashik Crime : ‘ताे’ हाडांचा सांगाडा डाॅ. सुवर्णा वाजे यांचाच; खून झाल्याचे निष्पन्न
चढाई सुखरुप, मात्र खाली परतताना..
ट्रेकिंगला आलेल्यांपैकी मयूर दत्तात्रय म्हस्के (Mayur Dattatraya Mhaske), अनिल शिवाजी वाघ (Anil Shivaji Wagh) या दोघांनी वर चढण्यासाठी असलेल्या जुन्या बोल्डिंगवर रोप लावला होता. रोपद्वारे सर्वजण सुखरूप शेंडीच्या डोंगरावर चढले. सर्वांनी वर चढल्यावर आंनद व्यक्त केला. तसेच मनसोक्त फोटो काढले. परतीच्या मार्गावर असताना यातील ८ मुली ७ तरुण खाली उतरले. मात्र पाठीमागे थांबलेले दोघे ट्रेकर बोल्डिंगमधून रोप काढत असताना अपघात झाला. वरचे बोल्डिंग दगड ठिसूळ असल्याने ते सटकले. यातच ट्रेकर असलेले मयूर दत्तात्रय म्हस्के, अनिल शिवाजी वाघ हे दोघे डोंगरावरून खाली पडले. यांच्यासोबत असलेला प्रशांत पवार (Prashant Pawar) हा तरुण देखील जखमी झाला.
नाशकातील सातपूरच्या कारखान्यात भीषण अग्नितांडव!; पहिला मजला जळून खाक
‘त्या’ दोघांना डोंगरावरुन खाली पडताना पहिले..
दोघे तरुण खाली पडत असताना डोंगरावर जाणाऱ्या काही व्यक्तींनी ते दृश्य पहिले. लोकांनी तात्काळ फोन करत रापली (Rapali), कातरवाडी (Katarvadi) येथील तरुणांना बोलावून घेतले. अपघात झाल्याचे लक्षात येताच सदर गावातील आणि मनमाड शहरातील तरुण घटनास्थळी दाखल झासे. त्यांनी त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन करत एका मृताला मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात (Manmad’s sub-district hospital) आणले. तर दुसरा व्यक्तीला रेस्क्यू करण्यात वेळ लागल्याने अंधार पडला. त्यानंतर रात्रीच्या अंधारात मृत तरुणाला शोधण्यात यश आले आणि तेथून रुग्णवाहिकेतून मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले.
‘असा’ झाला डॉ. सुवर्णा वाजे यांचा खुनाचा उलगडा; संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात
जखमी तरुणावर उपचार सुरु
दरम्यान, या घटनेमुळे नाशिककर तसेच संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला असून जखमी प्रशांत पवार याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. यातील १२ तरुण-तरुणींच्या जेवण आणि राहण्याची व्यवस्था रापली येथील माजी सरपंच संघरत्न संसारे यांच्या ग्रुपने केली होती.
Nashik Crime : असा झाला ‘त्या’ खुनाचा उलगडा; पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने काढला पतीचा काटा