सातपूर l Satpur :
येथील औद्योगिक वसाहतीतल्या निलराज कारखान्यात (Nilraj factory) आज (दि. ०२) बुधवारी पहाटे लागलेल्या आगीत पहिला मजला जळून खाक झाला आहे. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, कुठलीही जीवित हानी झाली नाही. आज पहाटे पाचच्या सुमारास ही घटना घडली.
आग लागल्याचे समजताच महापालिकेच्या अग्निशमन दलास (Municipal fire brigade) संपर्क साधण्यात आला. त्यानंतर अग्निशमन दलाचे ०३ बंब, एमआयडीसीचा (MIDC) ०१ बंब, महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीचा (Mahindra and Mahindra Company) ०१ बंबासह इतरही बंब घटनास्थळी दाखल झाले.
महापालिकेच्या कर्मचार्यांसह एकूण २५ जणांनी मिळून ही आग विझवली. या घटनेत कंपनीचा पहिला मजला जळून खाक झाला आहे. आगीत कॅपॅसिटर (capacitor) बसवण्यासाठी लागणारा लाखो रुपयांचा कच्चा माल जळाल्याचे समजते.
Nashik Crime : असा झाला ‘त्या’ खुनाचा उलगडा; पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने काढला पतीचा काटा