गेली ८ दिवस पोट दुःखतच होत, आंग नुस्त भरून आलं. कधी पाळी येऊन-जाईल याची वाट बघता, पाळी आली..! त्रास होणार हे माहिती असून ही पाळी आल्याचा आनंदात तिने छान कॉफी घेतली. तासाभरा नंतर पोटातून काही फुटाव इतक्या कळा येऊ लागल्या…
Blog (विशेष लेख) : उद्धवजी, सरकार विषयीच्या सहानुभूतीला ‘घर-घर’ लागेल असे निर्णय घेऊ नका…
कंबर नुसती आकसून गेली ती घरभर झालेला पसारा आवरून आतल्या खोलीत विव्हळत पडली. आता अंगातला सारा त्राण गेला आता ५ दिवस होण्याची वाट पाहु लागली. रोज तिच्या कुशीत जाणारा तो तसा बाजूलाच सरला. दुखतय तर जवळ घेणार कोणी नाही दुःखल म्हणून रडली तरी डोळे पुसणार कोणी नाही.
पाळीच्या वेदना असह्य करतात पण प्रेमाच्या वेदना जास्त घाव घालतात. इतर वेळी नको देऊ गजरा पण त्या ५ दिवसात काही हवंय..? का इतकं तरी विचार तिला. तिने तूझ्या समोर रडाव आणि मग तू डोळे पुसावेत..? बघ आतल्या खोलीत डोकावून तिच्या मुसुमुसू रडण्याची चाहूल लागेल तुला.
Blog (विशेष लेख) : कसयं ना शेठ… 16 ते 18 वर्षाच्या ‘रिल्स स्टार’ची जिंदगी
सांगत नाही ती माझं दुःखतय, कारण तिच्या प्रमाणे तुझा ही तोच समज दर महिन्याला तर येते यात नवीन काय..? दरमहा येते आणि दरमहा ती रडते, विव्हळत, तळमळते, झोपते. तरी सगळ्यांच्या प्रत्येक गोष्टीकडे बारीक नजर ठेवते.
तूही ठेव ना अशीच बारीक नजर तिच्या वेदनेवर सहानुभूती नाही, सन्मानानं आणि प्रेमानं बघ तिला आणि तिच्या पाळीच्या वेदनेला…
: काजल कोथळीकर, कोल्हापूर
आपण ह्या बातम्या वाचल्यात का?
Video : युक्रेन विरुद्ध वॉर, पुतीन यांची घोषणा; कीवमध्ये भीषण Blast
०१ एप्रिलपासून 'या' PF खात्यांवर द्यावा लागणार Tax; जाणून घ्या संपूर्ण माहिती
Today’s Horoscope : 'असा' असेल तुमचा आजचा दिवस; जाणून घ्या पंचांग अन् राशी मंथन,...
अखेर राज ठाकरेंवर 'या' कलमान्वये गुन्हा दाखल; गृहमंत्र्यांच्या बैठकीनंतर अटक होण...