
नाशिक l Nashik :
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या (Yashwantrao Chavan Maharashtra Open University YCMOU) ऑनलाईन परीक्षेत डमी विद्यार्थ्यांकडून परीक्षा दिल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या परीक्षेत राज्यभरातील तब्बल अडीच हजार विद्यार्थ्यांचे चेहरे मिसमॅच (Face Mismatch) असल्याचे समोर आले आहे. (2500 Dummy students given online exam of YCMOU)
https://twitter.com/ycmourcnashik
फेस रिडींगसाठी प्रॉक्टर टेक्नॉलॉजीचा वापर (Procter technology for face reading)
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षेत परीक्षार्थींच्या फेस रिडींगसाठी प्रॉक्टर टेक्नॉलॉजीचा करण्यात आला होता, मात्र याचा वापर करत डमी विद्यार्थ्यांनी परिक्षा (Dummy Student in Exam)दिली असल्याची माहिती समोर येत आहे. विद्यापाठाच्या 56 शिक्षणक्रमाच्या दि. 8 ते दि. 25 फेब्रुवारी दरम्यान हिवाळी सत्राच्या परीक्षा (Winter Session Exam) संपन्न झाल्या. या परीक्षेत डमी परीक्षार्थींकडून ऑनलाइन परीक्षा (Online Examination) दिल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
सावधान! राज्यात पुढील 5 दिवस धोक्याचे… देशातील 70 टक्के भागांत वाहणार भयंकर उष्णतेची लाट
5 सदस्यांच्या समितीकडून डमी विद्यार्थ्यांचा शोध (Search for dummy students by 5 member committee)
या प्रकरणी 5 सदस्यांची समिती डमी विद्यार्थ्यांचा शोध घेत असल्याची माहिती मिळत आहे. फेस डिटेक्शनमधील (Face Detection) विसंगती आणि विशिष्ट मर्यादेपेक्षा अधिकच्या वॉर्निंगमुळे मुक्त विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षांमध्ये हे केवळ परीक्षार्थींचे फेस मॅच न झाल्याचे गैरप्रकार समोर आले आहे. प्रॉक्टर टेक्नॉलॉजीद्वारे कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालेले सर्व पुरावे पडताळणी समितीकडे पाठविण्यात आले असून आता डमी विद्यार्थ्यांचा शोध घेतला जात आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने ऑनलाइन परीक्षांमध्ये फेस रिडिंग (Face Reading) होत असलेल्या प्रॉक्टर टेक्नॉलॉजीचा वापर करत परीक्षेतील गैरप्रकारांना पायबंद घातल्याचे सांगितले खरे, पण तरीही डमी सारखे गैरप्रकार समोर येत आहे.
राज्यात निवडणुकांचा बिगुल पावसाळ्यानंतर?; मविआला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता