इंधन दरवाढीची झळ बांधावर, शेतकऱ्यांना फटका : मशागतीचा खर्च वाढला

इंधन दरवाढीची झळ बांधावर, शेतकऱ्यांना फटका : मशागतीचा खर्च वाढला l Impact of Petrol Diesel Price Hike on farmers has increased cost-of Farming
इंधन दरवाढीची झळ बांधावर, शेतकऱ्यांना फटका : मशागतीचा खर्च वाढला l Impact of Petrol Diesel Price Hike on farmers has increased cost-of Farming
Share on Social Sites

यंदाचा राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरणाचा मान नाशिकला; राज्यपाल, मुख्यमंत्रीही राहणार उपस्थित

नाशिक l Nashik (वि. प्र.) :

आज शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान अवगत झाले असले तरी वाढत्या महागाईमुळे आधुनिक पद्धतीने शेती करताना शेतकऱ्यांची पूर्ती दमछाक होताना दिसत आहे. त्यातच वाढीव मजुरी देऊनही वेळेवर मजूर मिळत नाहीत. तसेच पेट्रोल-डिझेलचे भाव दिवसेंदिवस गगनाला भिडत (Petrol Diesel Price Hike) असल्याने सर्व सामान्य शेतकऱ्यांना ट्रॅक्टरने शेती करणे परवडत नाही. त्यापेक्षा एकदाची शेती सोडून दिलेली बरी अशी मानसिकता शेतकऱ्यांची झाल्याचे दिसून येत आहे. (Modern Farming)

एप्रिल फूल नव्हे, एप्रिल फायर!; ग्राहकांना झटका, सिलिंडरच्या दरात मोठी वाढ

दरवर्षी उमेदीने नवनवीन प्रयोग करुन शेती करण्याचा प्रयत्न शेतकरी करत असतो. त्यासाठी जीव ओतून तो दिवस रात्र शेतीकडे लक्ष देतो पहिल्या आणि आत्ताचा शेत मजुरांमध्ये फरक पडला आहे. आधी रोजंदारी कमी असायची शेतकरी न बोलता शेतात वेळेवर मजूर यायचा पण आता परिस्थिती उलट आहे.

मजुरांना आणायला त्यांच्या घरी वाहन पाठवावे लागते मजुरी पाचशे रुपये देऊनही मजूर मिळत नसल्याने शेतकरी वेटीस आला आहे. त्यात वाढत्या महागाईने अधिकच जेरीस आणले आहे. खुद्द बागायतदारांना मजूर होण्याची वेळ आली आहे.

https://ekhabarbat.com/demand-of-headmasters-group-to-education-authorities-for-early-training-nashik/

See also  संजय राऊतांचा विरोधकांवर घणाघात; मुख्यमंत्र्यांवर टीका करणारे 'नामर्द'

आता यंत्राविना शेती करणे अशक्य (Impossible to farm without machinery)

शेती मशागतीपासून ते शेतमाल बाजारात दाखल करण्यासाठी वाहनांचा वापर केला जातो. मशागती मध्ये नांगरणी, कोळपणी रोटरने पेरणी तेवढेच नाही तर उगवण झालेल्या पिकांची मशागत देखील ट्रॅक्‍टरच्या साहाय्याने केली जाते. सुरुवातीच्या काळात मोजकेच शेतकरी आधुनिक यंत्रांचा वापर करून शेती करीत होते. आज मात्र काळाच्या ओघात आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे यंत्राच्या वापराशिवाय शेती करणे अशक्य झाले आहे.

नवाब मलिकांच्या मालमत्तेसंदर्भात नाशकात ईडीची धाड

वर्षभरात ट्रॅक्‍टर मशागत दुप्पट महाग (Tractor farming is twice as expensive in a year)

मागील वर्षी ट्रॅक्टरने शेती करणे काहीसे परवडत होते पण आजच्या घडीला पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्याने 1400 रुपये प्रति एकरा वरून 2000 रुपये प्रति एकर मशागतीसाठी खर्च येऊ लागला आहे. त्यामुळे ट्रॅक्टरने शेती करणे महाग झाले आहे. ‘खर्च लाखात उत्पन्न हजारात’, शेतीत मेहनत केली तर पैसा मिळतो काही वर्षापासून शेतीला कायम फटका बसत आहेत खर्च लाखातून आणि उत्पन्न हजारात यायला लागले मजुरी आणि खर्च ताळमेळ बसत नाहीत मग शेती करायची तरी कोणत्या आशेवर असा प्रश्न असल्याने शेतकरी हतबल झाले आहे.

: सुदाम हळदे, अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, नाशिक तालुका

‘दोघांना’ हेल्मेट सक्ती करणारे नाशिकचे पोलिस आयुक्तांनी मागितली बदली

See also  दुधाच्या ट्रकचा आणि टेम्पोचा भीषण अपघात, 5 जणांचा जागीच मृत्यू : खान्देशातील दुर्दैवी घटना

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?

See also  Today’s Horoscope : जाणून घ्या आजचे पंचांग अन् राशी मंथन, शुक्रवार, 12 ऑगस्ट 2022

Share on Social Sites