
मुंबई l Mumbai :
कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाल्याने राज्यातील शाळांपाठोपाठ आता राज्यातील सर्व महाविद्यालये आणि विद्यापीठे (College and University) पुन्हा सुरू करण्याचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाने (Department of Higher and Technical Education) घेतला आहे.
राज्यातील महाविद्यालय प्रत्यक्ष येत्या ०१ फेब्रुवारी २०२२ पासुन सुरु करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी काल (मंगळवारी) मान्यता दिली आहे, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Higher and Technical Education Minister Uday Samant) यांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे शाळांप्रमाणेच महाविद्यालये, विद्यापीठे सुरु करण्याचे अंतिम अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत.
राज्यातील महाविद्यालय प्रत्यक्ष ०१ फेब्रुवारी पासुन सुरु होणार आहेत. परंतु कोविडची परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचा अधिकार विद्यापिठ आणि स्थानिक प्रशासनाला असेल, ज्या विद्यार्थ्यांचे दोन डोस (Corona Vaccination) पुर्ण झालेले आहेत त्यांनाच प्रवेश मिळणार.
https://twitter.com/samant_uday/status/1485990272379015169
१५ फेब्रुवारी पर्यंत घेण्यात येणा-या परीक्षा ऑनलाईन (Online Exam) घेण्यात याव्यात तर त्यानंतर परीक्षा ऑफलाईन घ्यायच्या किंवा ऑनलाईन याचा विचार स्थानिक पातळीवर घेण्याचा अधिकार आहे. गेल्या सोमवारपासून शाळा सुरु झाल्या. मात्र १८ वर्षांवरील सर्वांचं लसीकरण सुरु असतानाही महाविद्यालये सुरु करण्याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नव्हता.
राज्यात व देशात १५ वर्ष ते १८ वर्ष वयोगटातील शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे लसीकरण सुरू केले असताना कोरोना प्रादुर्भावाची लक्षणे कमी असल्याने इतर आस्थापन, बार मॉल हे सर्व सुरू आहे. परंतु, शाळा महाविद्यालये बंद ठेवणे म्हणजे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात लोटणे सारखे असून शासनाने तत्काळ शाळा महाविद्यालये सुरू करावीत अशी मागणी करण्यात येत होती.