नवी दिल्ली l New Delhi :
आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास (RBI Governor Shaktikanta Das) यांनी रेपो दरात (Repo Rate) 0.40 टक्क्यांनी वाढ केल्याची अचानक घोषणा केली आहे. यामुळे बँकांसह सर्वसामान्यांना कर्ज घेणे (Bank Loan) आता महाग होणार आहे. महागाईमुळे आधीच कंबरडे मोडलेल्या सामान्यांना आणखी एक जोरदार झटका बसला असून, रेपो रेटमध्ये वाढ करण्याचा निर्णयामुळे बँकेच्या कर्जांचे हप्ते महागणार आहेत.
ठाकरे सरकारला ‘जोर का झटका’; दोन आठवड्यात निवडणुका जाहीर करण्याचे ‘सर्वोच्च’ आदेश
रिझर्व्ह बँकेच्या (Reserve Bank of India) या निर्णयाचे पडसाद शेअर बाजारावरही दिसून आले. शेअर बाजारात मोठी पडझड झाली आहे. दरम्यान, आरबीआयच्या या निर्णयाचा फटका सामान्यांना बसणार असून, यामुळे सर्वसामान्यांच्या कर्जांचे हप्ते वाढणार आहे. (RBI Increase Policy Repo Rates)
MPC votes unannimously to increase policy repo rates by 40 bps with immediate effect: RBI Governor Shaktikanta Das pic.twitter.com/JWM6ZwKTo3
— ANI (@ANI) May 4, 2022
रेपो रेटवर, रिझर्व्ह बँक व्यावसायिक बँकांना त्यांच्या तात्काळ गरजा पूर्ण करण्यासाठी कर्ज देते, तर रिव्हर्स रेपो रेट अंतर्गत, बँकांना त्यांचे पैसे रिझर्व्ह बँकेकडे ठेवण्यावर व्याज मिळते. गेल्या दोन वर्षांपासून आरबीआयने उदार धोरण ठेवले होते. एप्रिल 2022 पर्यंत चलनविषयक धोरण समितीच्या मागील 11 बैठकांमधून धोरण दर अपरिवर्तित ठेवण्यात आले होते. या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या बैठकीत एमपीसीने (MPC) पॉलिसी रेट रेपो 4 टक्के आणि रिव्हर्स रेपो रेट 3.35 टक्के कायम ठेवला होता.
Twitter वापरासाठी ‘या’ युजर्सना लवकरच द्यावे लागणार पैसे; कोण ‘फ्री’ वापरु शकणार ट्विटर?
शेअर बाजारात पडझड (Fall in the stock market)
रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केल्याचा घोषणेचा परिणाम शेअर बाजारावर दिसून आला आहे. या घोषणेनंतर सेन्सेक्स 1300 अंकानी कोसळला आहे. तर, निफ्टी (Nifty) 387 अंकानी कोसळला आहे.
आपण ह्या बातम्या वाचल्यात का?
...अन् झोका देणे जीवावर बेतले, 6 महिन्याच्या भावासह बहिणीचा अंत; खान्देशातील हृद...
हुबळीमध्ये भीषण अपघात : 8 जण जागीच ठार, 28 जखमी; मृतांमध्ये 6 महाराष्ट्रातले
खळबळजनक! जळगाव जिल्ह्यात तब्बल पशुवैद्यकीय ३२ डाॅक्टर बाेगस; क्षमता नसताना शस्त्...
LIVE : संजय राऊतांच्या स्फोटक आरोपानंतर आता नारायण राणे रींगणात; पाहा लाईव्ह व्ह...