घोटी l Ghoti : (युवराज राजपुरे) :
नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे (Graduates Constituency MLA Dr. Sudhir Tambe) यांच्या स्थानिक विकास निधीतून इगतपुरी तालुक्यातील (Igatpuri Taluka) अतिदुर्गम भागातील तब्बल अकरा शाळांना संगणक संचाचे वाटप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव भास्कर गुंजाळ (Maharashtra Pradesh Congress Committee Secretary Bhaskar Gunjal) यांच्या हस्ते करण्यात आले. घोटी येथील संभाजी नगर सभागृहात (Sambhaji Nagar Hall, Ghoti) हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

व्यासपीठावर काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष उत्तमराव भोसले (Congress District Vice President Uttamrao Bhosale), जेष्ठ नेते बाळासाहेब वालझाडे (Senior Leader Balasaheb Walzade), इगतपुरी युवक शहराध्यक्ष गणेश कौटे (Igatpuri Youth City President Ganesh Kaute), अनु विभाग तालुकाध्यक्ष संतोष जगताप (Anu Vibhag Taluka President Santosh Jagtap), युवक ता. सरचिटणीस योगेश सुरुडे (Youth Taluka General Secretary Yogesh Surude), लक्ष्मण गोडे आदी उपस्थतीत होते.
सार्वजनिक शौचालय तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी; श्रमजीवी संघटनेचे अकोले पंचायत समितीला निवेदन
यावेळी इगतपुरी सारख्या आदिवासी तालुक्यात डॉ. तांबे यांनी जातीने लक्ष घातले असून यापूर्वीही अनेक शाळांना संगणक संच दिले आहेत. म्हणून आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात आदिवासी भागातील विद्यार्थी शिक्षण घेऊन मोठा होत आहे. तसेच एसएमबीटी (SMBT) येथे शिक्षण संस्थेच्या माध्यमातून उच्च शिक्षण मिळत असल्याने तालुका नकाशावर आणण्याचे काम डॉ. तांबे यांनी केले असल्याचे प्रदेश सचिव गुंजाळ (State Secretary Gunjal) यांनी सांगितले.
Shark Tank India ची आदित्य ठाकरेंकडून दखल; नाशिकमधील स्टार्टअपला दिली ‘ही’ ऑफर
