
नवी दिल्ली l New Delhi :
आतापर्यंत फक्त १२ वर्षांवरील मुलांनाच कोरोनाची लस (Corona Vaccine) दिली जात होती. मात्र आता २ ते ६ वर्षे वयोगटातील मुलंही देशात सर्वात कमी वयात कोरोनाची लस घेणारी मुले बनली आहेत. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (Seram Institute of India) विकसित केलेले कोवोवॅक्स (Covovax Vaccine) ट्रायल दरम्यान २ ते ६ वयोगटातील २३० मुलांना देण्यात आले. या मुलांना कोवोवॅक्सचा पहिला डोस आधीच मिळाला आहे.
या मुलांना कोवोवॅक्सचा दुसरा डोस २१ दिवसांनी दिला जाईल. कोवोवॅक्सची ट्रायल मे महिन्यापर्यंत पूर्ण होईल. यानंतर २ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना कोवोवॅक्स लस दिली जाईल.
देशाच्या विविध भागांतील १० रुग्णालयांमध्ये ट्रायल दरम्यान या मुलांना कोवोवॅक्स लस देण्यात आली. कोवोवॅक्सच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, देशातील १० रुग्णालयांमध्ये ट्रायल दरम्यान २३० सर्वात लहान मुलांना ही लस देण्यात आली आहे. भारतात कोवोवॅक्सची ही एडवांस ह्युमन ट्रायल आहे.
नवाब मलिक यांना ईडीकडून अटक, पण कार्यालयातून ‘नही झुकेंगे और लढेंगे’ म्हणत हसतहसत बाहेर पडले
ऑगस्टमध्ये सुरु झाले होते ट्रायल (The trial began in August)
फेज २ आणि फेज ३ मुलांवर कोवोवॅक्सच्या ट्रायल ऑगस्टमध्ये सुरू झाल्या होत्या. या ट्रायलमध्ये एकूण ९२० मुले सहभागी होत आहेत. यामध्ये १२ ते १७ वयोगटातील ४६० मुले, ७ ते ११ वर्षे वयोगटातील २३० मुले आणि २ ते ६ वर्षे वयोगटातील २३० बालकांचा समावेश आहे. सीरम इन्स्टिट्यूट व्यतिरिक्त, भारत बायोटेक (Bharat Biotech), दोन ते सहा वर्षे वयोगटातील मुलांवरही कोवॅक्सिनची ट्रायल करत आहे.
सीरम इन्स्टिट्यूटने प्रथम किशोरवयीन मुलांवर कोवोवॅक्सची ट्रायल घेण्याच्या मंजुरीसाठी औषध नियामक संस्थेकडे अर्ज केला होता. सीरम इन्स्टिट्यूटला ७ ते ११ वर्षे वयोगटातील मुलांवर ट्रायल घेण्यास मान्यता देण्यात आली. जेव्हा त्यांना किशोरवयीन मुलांवरील सुरक्षिततेच्या सर्व पैलूंची खात्री होती. त्यानंतर आता २ ते ६ वर्षे वयोगटातील मुलांवर याची ट्रायल केली जात आहे.
देशातली पहिली BSL-3 लॅब नाशिकमध्ये; २५ कोटी खर्चून निर्मिती, काय काम, महामारीत महत्त्व कसे?
प्रोटिन आधारित लस (Protein based vaccines)
किशोरवयीन मुलांवरील ट्रायलच्या सर्व पॅरामीटर्सवर सुरक्षिततेची खात्री झाल्यानंतर, सीरम इन्स्टिट्यूटने २ ते ६ वर्षांच्या मुलांवर ट्रायल सुरू केली आहे. एका अधिकाऱ्यानं सांगितले की, आम्ही प्रथम किशोरवयीन मुलांवर याची ट्रायल केली. त्यानंतर ७ ते ११ वर्षांच्या मुलांवर ही ट्रायल करण्यात आली आणि आता २ ते ६ वर्षांच्या मुलांवर ही ट्रायल केली जात आहे. या मुलांवर पुढील सहा महिने लक्ष ठेवण्यात येणार आहे.
Covovax Nanoparticle NVX-CoV2373 ही अमेरिकन बायोटेक्नॉलॉजी फर्म नोवावॅक्स (American biotechnology firm Novavax) द्वारे विकसित केलेली प्रोटीन-आधारित लस आहे. त्याचा भारतातील सीरम इन्स्टिट्यूटशी करार आहे. भारतात ते Covovax या ब्रँड नावाने ओळखले जाते.
दहावी-बारावीच्या परीक्षा Offline की Online ?, याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने दिला ‘हा’ मोठा निर्णय
आपण ह्या बातम्या वाचल्यात का?
चला तयारीला लागा भावांनो! राज्यात लवकरच होणार ७ हजार पोलिसांची मेगाभरती
Chandrashekhar Guruji : खळबळजनक! ‘सरल वास्तू’चे चंद्रशेखर गुरुजी यांची चाकूने भो...
नाशिकचा गड जिंकण्यासाठी पुन्हा 'संकटमोचक '... रावल यांची गच्छंती
Improve Memory Tips in Marathi : तुम्हीही विसरता गोष्टी? 'स्मरणशक्ती' तीक्ष्ण कर...