क्या बात हैं.. आता WhatsApp वरुनही चित्रपट, वेबसिरिज पाठवता येणार

क्या बात हैं.. आता WhatsApp वरुनही चित्रपट, वेबसिरिज पाठवता येणार l Users may share up to 2GB Data on WhatsApp now update
क्या बात हैं.. आता WhatsApp वरुनही चित्रपट, वेबसिरिज पाठवता येणार l Users may share up to 2GB Data on WhatsApp now update
Share on Social Sites

मुंबई l Mumbai :

सोशल मीडिया अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप (Social Media App WhatsApp) आपल्या वापरकर्त्यांसाठी नवनवीन फिचर्स घेऊन येत असते. आता मेसेजिंग अ‍ॅप (Messaging App) एका नवीन फीचरवर काम करत आहे, ज्यामुळे बीटा टेस्टर्सना (Beta testers) 2GB पर्यंत फाइल्स पाठवता येतील. हे नवीन फीचर अँड्रॉईड (Android) आणि आयओएस (iOS) या दोन्हींसाठी उपलब्ध असेल.

सध्या हे फिचर अर्जेंटिनामध्ये (Argentina) सुरू करण्यात आले असून, ते इतरत्र कधी येणार याबाबत सध्या कोणतीही माहिती नाही. आपल्या सर्वांना माहित आहे की, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म (Social Media Platform) एका विशिष्ट आकारापर्यंत मीडिया फाइल्स शेअर करण्याची परवानगी देतात.

‘द बर्निंग ओला स्कूटर’; पाहा भयावह Viral Video

व्हॉट्सअ‍ॅपची नवीन फाइल मर्यादा आता खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण, लोक हाय मेगापिक्सेल लेन्स (High Megapixel Lense) वापरत आहेत असल्याने हाय रिझोल्यूशन फोटो (High Resolution Photos) आणि व्हिडिओ (Video) तयार करतात जे आकाराने मोठे असतात.

ते पाठवण्‍यासाठी, लोकांना सहसा ते अ‍ॅप-मधील किंवा थर्ड-पार्टी अ‍ॅप (Third-Party App) द्वारे कमी किंवा संपादित करावे लागते. मीडिया फाइल काँम्प्रेस (Compressing Media Files) केल्याने क्वालिटी देखील खराब होते आणि रिझल्टवर परिणाम होतो.

काय सांगताय! होय, तुम्ही कोणाशी आणि किती वेळ बोलता Google या Apps द्वारे चोरी करतोय डेटा

सध्या 100MB पर्यंत फाईल्स शेअर करता येतात (Currently up to 100MB of files can be shared)

व्हॉट्सअ‍ॅप सध्या 100MB पर्यंतच्या मीडिया फाइल्स अ‍ॅपद्वारे पाठवण्याची परवानगी देते. परंतु, या नवीन अपडेटसह, इन्स्टंट-मेसेजिंग अ‍ॅप (Instant Messaging App) वापरकर्ते कोणत्याही अडचणी शिवाय 2GB पर्यंतच्या फाइल्स पाठवू शकतात.

व्हॉट्सअ‍ॅप ट्रॅकर (WhatsApp Tracker), व्हॉट्सअ‍ॅप बीटा इन्फो (WABetaInfo), म्हणते की हे नवीन वैशिष्ट्य अर्जेंटिनामधील काही बीटा टेस्टर्ससाठी (Beta Testers, Argentina) उपलब्ध आहे. अंतिम रोलआउटमध्ये बदल होऊ शकतो किंवा व्हॉट्सअ‍ॅप फक्त सध्याची 100MB मर्यादा ठेवू शकते आणि 2GB फाइल्सची कल्पना वगळू शकते.

काय सांगता! ४२ सेकंदात YouTuber ने केली तब्बल १ कोटी ७५ लाख रुपयांची कमाई; कसं झालं शक्य?

See also  खळबळजनक! पुण्यात किडनी रॅकेटचा पर्दाफाश, 'रुबी'च्या 15 डॉक्टरांवर गुन्हा दाखल

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?


Share on Social Sites