‘देवेंद्रनीतीचा’ पुन्हा विजय! विधान परिषद निवडणुकीत राज्यसभेसारखीच कमाल, भाजपचे पाचही उमेदवार विजयी

'देवेंद्रनीतीचा' पुन्हा विजय! विधान परिषद निवडणुकीत राज्यसभेसारखीच कमाल, भाजपचे पाचही उमेदवार विजयी l Vidhan Parishad Election result All five BJP Candidtaets won in Legislative Ccouncil elections
'देवेंद्रनीतीचा' पुन्हा विजय! विधान परिषद निवडणुकीत राज्यसभेसारखीच कमाल, भाजपचे पाचही उमेदवार विजयी l Vidhan Parishad Election result All five BJP Candidtaets won in Legislative Ccouncil elections
Share on Social Sites

मुंबई l Mumbai :

विधान परिषदेच्या (Legislative Council) 10 जागांसाठी सोमवारी (दि. 20) पार पडलेल्या चुरशीच्या निवडणुकीत राज्यात विरोधी पक्षाच्या भूमिकेत असलेल्या भाजपने (BJP) बाजी मारली. भाजपचे सर्व 5 उमेदवार निवडून आले असून सत्ताधारी महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) चंद्रकांत हंडोरे (काँग्रेस) (Chandrakant Handore (Congress) यांचा पराभव झाला. राज्यसभा निवडणुकीपाठोपाठ झालेल्या या निवडणुकीत भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा करिष्मा कायम राहिला.

12 तासांमध्ये बदललं राज्याचं राजकारण; नाराज एकनाथ शिंदेंचे ठाकरे सरकारला हे ‘तीन’ प्रस्ताव, ‘इथून’ पडली बंडाची ठिणगी

रात्री 9.30 वाजता पहिल्या पसंतीचा मतांचा कल हाती आला. त्यामध्ये भाजपला (Bharatiya Janata Party BJP) पहिल्या पसंतीची 134, तर आघाडीला 151 मते मिळाली. तत्पूर्वी, सकाळी 9 वाजता मतदानास प्रारंभ झाला. सायंकाळी चारपर्यंत सर्व 285 आमदारांनी मतदान केले. 5 वाजता मतमोजणीस प्रारंभ होण्यापूर्वी आघाडीच्या बाजूने भाजपच्या दोन आमदारांच्या मतांवर आक्षेप घेतला. दोन मतांवर राष्ट्रवादी (NCP) व भाजपने आक्षेप नोंदवले.

परिणामी पुन्हा दीड तास मतमोजणीचा खोळंबा झाला. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दोन्ही मते बाद ठरवली. रात्री 9 वाजता वैध 283 मतपत्रिकांची छाननी पूर्ण झाली. पहिल्या पसंतीच्या मतांवर भाजपचे (BJP) 5, राष्ट्रवादीचे (NCP) 2, शिवसेनेचे (Shiv Sena) 2 उमेदवार विजयी ठरले. काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore), भाई जगताप (Bhai Jagtap) आणि भाजपचे प्रसाद लाड (BJP’s Prasad Lad) यांच्यात दुसऱ्या फेरीमध्ये चुरस निर्माण झाली. रात्री साडेदहा वाजता दुसऱ्या फेरीत भाजपचे प्रसाद लाड आणि काँग्रेसचे भाई जगताप विजयी ठरले.

आघाडी सरकार टिकणे कठीण

विधान परिषद निवडणुकीत सोमवारी (जून २०) झालेल्या मतदानात सत्ताधारी महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) विधानसभेतील पाठबळ चक्क 151 पर्यंत खाली आल्याचे स्पष्ट झाले. राज्यसभा निवडणुकीत आघाडीचे संख्याबळ 162 होते. राज्यसभेपूर्वी मविआकडे 170 संख्याबळ होते. राज्यसभा निवडणुकीत ते दहाने घटले आणि विधान परिषदेत एकूण 19 मते कमी झाली. तर, भाजपचे संख्याबळ 134 वर पोहोचले आहे. हेच गणित गृहीत धरले तर सरकार टिकण्यासाठी बहुमताचा आकडा 143 वर येतो.

मविआ आणि भाजपमधील संख्याबळात अत्यल्प अंतर राहिल्याने सरकार अडीच वर्षे टिकणे कठीण आहे. अडीच वर्षांपूर्वी तीन पक्षांच्या महाविकास आघाडीच्या सरकारने विधानसभेत बहुमत प्राप्त केले होते. तेव्हा 170 आमदारांचा सरकारला पाठिंबा होता, तर विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडे 105 सदस्य होते. दि. 10 जून रोजी राज्यसभेसाठी मतदान झाले. त्यामध्ये भाजपच्या 3 सदस्यांना पहिल्या पसंतीची 123 मते मिळाली होती. दहा दिवसांनंतर आज पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत भाजपच्या 5 उमेदवारांना पहिल्या पसंतीची 134 मते मिळाली आहेत.

त्याउलट सत्ताधारी महाविकास आघाडीच्या संख्याबळाचा आलेख खालावत चालला आहे. राज्यसभा निवडणुकीत आघाडीच्या 4 उमेदवारांना पहिल्या पसंतीची 162 मते मिळाली होती. आज पार पडलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत आघाडीच्या ५ उमेदवारांना पहिल्या पसंतीची केवळ 151 मते पडली आहेत.

सत्ताधारी आघाडीत तीन पक्ष आहेत. त्यामध्ये काँग्रेसकडे 44, राष्ट्रवादीकडे 53 आणि शिवसेनेकडे 55 असे एकूण 152 सदस्य आहेत. सत्ताधारी बाकावरील बाजूला 288 च्या निम्मे म्हणजे 145 सदस्यांचे पाठबळ असावे लागते. आज लागलेल्या विधान परिषद निकालात आघाडीकडे काठावर बहुमत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आघाडीच्या नाराज असलेल्या 7 आमदारांनी राजीनामा दिल्यास सरकार अल्पमतात येऊ शकते.

निकालाचा परिणाम

  • विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Leader of the Opposition Devendra Fadnavis) हे करिष्मा असलेले नेते असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे. फडणवीस यांचा पक्षात आणि राज्याच्या राजकारणात दबदबा आणखी वाढणार आहे.

  • या निकालाने विरोधी पक्ष आणखी आक्रमक होईल. त्याउलट सलग दोन पराभव नोंदल्याने महाविकास आघाडी सरकार बचावाच्या पवित्र्यात जाईल.

  • महाविकास आघाडी सरकारच्या पाठीराख्या आमदारांमध्ये नाराजी असल्याचे सिद्ध झाले असून आघाडीत समन्वय नसल्याचे अधोरेखित झाले.

  • जुलैमध्ये होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात सरकारला विरोधकांच्या आरोपांना तोंड देणे मुश्कील होणार आहे. सरकारवर अविश्वास ठराव दाखल होऊ शकतो.

  • महाविकास आघाडीत यापुढे बेबनाव वाढत जाईल आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (NCP)आणि काँग्रेस (Congress) आघाडी उघडतील.

See also  प्रतीक्षा संपली! KTM RC 390 चे नवीन मॉडेल लाँच; जाणून घ्या किंमत, फिचर्स अन् बरचं काही

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?


Share on Social Sites