मुंबई l Mumbai :
आतापर्यंत मोबाईल तंत्रज्ञानाने 4 जी (4G) पर्यंत ज्या गतीने आयुष्य बदलले आणि जगण्याची गती वाढवली त्यापेक्षा दुप्पट वेगाने 5 जीची (5G) डिजिटल क्रांती (5G Digital Revolution) येऊ घातली आहे.
The beginning of a new era for Indian Telecom.
5G spectrum auction announced. #BharatKa5G— Ashwini Vaishnaw (मोदी का परिवार) (@AshwiniVaishnaw) June 15, 2022
इंटरनेट ऑफ थिंग्ज (Internet of Things), औद्योगिक आयओटी (industrial IoT) तसेच रोबोटिक्स तंत्रज्ञानातील (Robotics Technology) प्रगतीची दारे खुली होतील. ‘ई-गव्हर्नन्स’ची (E-governance) व्यापकता वाढेल. कोरोनात विस्कटलेली आर्थिक घडी आता सावरते आहेच. लसीचा ‘बूस्टर डोस’ (Booster Dose) ही सुरू आहे, इथून पुढे 5-जी सुरू होणे ही बाब अर्थव्यवस्थेसाठी ‘सुपर बूस्ट’ (चालना) ठरणार आहे.
अगले 20 साल के लिए सरकार 5G स्पेक्ट्रम अगले महीने जुलाई में नीलाम करेगी #5GSpectrum
— Focus Bharat (@focus_bharat) June 16, 2022
कृषी (Agriculture), आरोग्य (Health), रोजगार (Employment), शिक्षण (Education) अशा सर्वच क्षेत्रांमध्ये आमूलाग्र बदल होतीलच; पण रस्त्यावर चालकाशिवाय कार चाललेली आहे, याची कल्पनाही तुम्ही आज करू शकता का? नाही! तर… 5जी सेवा सुरू होताच चालकरहित कार ही कल्पना वास्तवात उतरण्याची शक्यताही बळावणार आहे.
5G spectrum auction will be completed by July end. We will also have consultations with telecom service providers & will try to come up with 5G services as soon as possible. We're hopeful that auction will get a good response from service providers: Union Communications Minister pic.twitter.com/LwIy7K2vqv
— ANI (@ANI) June 15, 2022
5-जी सेवेनंतर होणार ‘हे’ फायदे (Benefits of 5G service)
-
वेग वाढणार (Internet Speed will increase) : मोबाईलवरील इंटरनेटचा वेग वाढेल. काही मिनिटांत नव्हे; तर काही सेकंदात तुम्ही काहीही डाऊनलोड करू शकाल. ‘लाईव्ह स्ट्रिमिंग’ (Live Streaming) कुठल्याही व्यत्ययाशिवाय तासन्तास सलग बघू शकाल.
-
जीव वाचणार (Life will be saved) : 5जी रोड म्हणजेच रस्त्यांवर सेन्सर्सच्या मदतीने स्वयंचलित पद्धतीने लोकांचा जीव वाचवता येईल. 5-जीच्या मदतीने गाडीत सेन्सर काम करेल आणि तुमच्या वाहनाच्या आसपास कुठलाही धोका येताच यातील ऑटोनॉमस सिस्टीम (Autonomous System) त्याचा वेधही घेईल आणि आपोआप ब्रेकही लागेल.
-
शेतकर्यांना उपयुक्त (5G Useful for farmers) : कृषी क्षेत्र डिजिटलाईज्ड होण्यात मोठी मदत होईल. ड्रोनच्या (Drone) मदतीने 5-जी तंत्रातून जमिनीचा पोतही तपासता येईल. शेतकर्यांना त्याचा लाभ होईल.
-
रोजगार उपलब्ध होणार (Employment will be available) : नोकर्यांच्या, रोजगाराच्या संधी वाढतील. भारतासारख्या बेरोजगारी अधिक असलेल्या देशात तर 5-जी फारच उपयुक्त ठरणार. यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.
-
आरोग्य सुविधेस लाभ (Benefits of Health Facilities) : 5-जीच्या मदतीने देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत दर्जेदार आरोग्य सुविधा पोहोचवता येतील. मेडिकल डिव्हाईस जोडून कुणाचीही घरबसल्या वैद्यकीय तपासणी करता येईल. एक्स-रेही (X-ray) काढता येऊ शकेल.
https://ekhabarbat.com/tech-news-dot-big-announcement-5g-launch-in-india-first-for-these-13-cities/