
नाशिक l Nashik :
विविध आदेश काढून वादग्रस्त चर्चेत असणारे नाशिक शहराचे पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांची बदली झाली (Nashik city police commissioner Deepak Pandey has been transferred) असून त्यांच्या जागी जयंत नाईकनवरे (Jayant Naikanavare) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
उद्धवा, अजब तुझे… पोलीस पदन्नोतीच्या आदेशाला अवघ्या 12 तासांत स्थगिती; कुणाचं प्रमोशन थांबवलं?
पांडेय यांनी मार्च महिन्यात स्वत:हून विनंती अर्ज करून अकार्यकारी पदावर नियुक्ती मागितली होती. त्यानंतर दि. 20 एप्रिलला गृहविभागाने (State Home Department) राज्यातील 14 अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यात पांडेय यांचाही समावेश आहे. दीपक पांडेय यांची महिला अत्याचार प्रतिबंधक विभागात नियुक्ती करण्यात आली आहे.
लग्नापूर्वीच ‘या’ गायिकेचा Porn Video व्हायरल; गायिकेने केले भावनिक आवाहन
मावळते पोलिस आयुक्त पांडे (IPS Deepak Pandey) यांनी नाशिकचा पदभार स्वीकारल्यापासून अनेक आदेश काढले. त्यात ‘नो हेल्मेट नो पेट्रोल’ (No Helmet, No Petrol), हेल्मेट नसल्यास दोन तास समुपदेशन, लेखी परिक्षा घेण्यास सांगितले.
त्याचप्रमाणे विना हेल्मेट चालकांना पेट्रोल दिल्यास पेट्रोलपंपचालकांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. त्यामुळे त्यांच्याविरोधात नाराजी पसरली होती. त्याचप्रमाणे राजकीय पदाधिकाऱ्यांवर विनापरवानगी मोर्चे, आंदोलन, कार्यक्रम आयोजित केल्यास गुन्हे दाखल झाल्याने राजकीय पदाधिकाऱ्यांमध्येही नाराजी होती.
लज्जास्पद! सासऱ्याने लेकीसमान सूनेवरच केला वारंवार बलात्कार; खान्देशातील खळबळजनक घटना
सर्वसामान्य नागरिकांना कार्यक्रम घेताना पुर्वपरवानगी घ्यावी लागत असल्याने त्यांच्यातही नाराजी होती. दरम्यान, पांडेय यांनी मार्च महिन्यातच शासनाकडे बदलीसाठी विनंती केली होती. खासगी कारणामुळे त्यांनी अकार्यकारी पदावर बदली मागितली होती.
त्यानुसार त्यांची विनंती मान्य झाली असून त्यांना अद्याप नवीन पदभार सोपवलेला नसला तरी त्यांच्या जागी मुंबईतील व्ही. आय. पी. सुरक्षाचे पोलिस उपमहानिरीक्षक जयंत नाईकनवरे (IP Deputy Inspector General of Police Jayant Naiknavare) यांची नियुक्ती केली आहे.
धक्कादायक! प्रेयसीच्या मुलीवर प्रियकराचा अनैसर्गिक अत्याचार; दोघेही होते Live in Relationship मध्ये
नाईकनवरे यांनी सातारा (Satara), वर्धा (Wardha), पुणे (Pune), मुंबई (Mumbai) जिल्ह्यांमध्ये सेवा बजावली आहे. त्याचप्रमाणे नाशिक परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर (Nashik Deputy Inspector General of Police B G Shekhar) यांना विशेष पोलिस महानिरीक्षकपदी (Inspector General of Police) पदोनन्नती दिली आहे.
आपण ह्या बातम्या वाचल्यात का?
Maharashtra BJP 12 MLA Suspension : ठाकरे सरकारला झटका; भाजपाच्या 'त्या' १२ आमदा...
Shark Tank India ची आदित्य ठाकरेंकडून दखल; नाशिकमधील स्टार्टअपला दिली ‘ही’ ऑफर
Helicopter Crash In Kedarnath : केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळून 6 जणांचा मृत्यू
College Reopen : ठरलं! राज्यातील युनिव्हर्सिटी कॅम्पस पुन्हा गजबजणार