Monkeypox : युरोपसह 12 देशांत ‘मंकीपॉक्स’चा फैलाव; केंद्र सरकार ॲक्शन मोडमध्ये, दिले ‘हे’ निर्देश

Monkeypox : युरोपसह 12 देशांत 'मंकीपॉक्स'चा फैलाव; केंद्र सरकार ॲक्शन मोडमध्ये, दिले 'हे' निर्देश l Monkeypox Outbreak In Europe, US Raises Concerns In India
Monkeypox : युरोपसह 12 देशांत 'मंकीपॉक्स'चा फैलाव; केंद्र सरकार ॲक्शन मोडमध्ये, दिले 'हे' निर्देश l Monkeypox Outbreak In Europe, US Raises Concerns In India
Share on Social Sites

नवी दिल्ली l New Delhi :

कोरोना प्रादुर्भावा पाठोपाठ जगाची धाकधूक आता मंकीपॉक्सनं वाढवली आहे. (Monkeypox Virus) जगभरात मंकीपॉक्सच्या रुग्णसंख्येत हळूहळू वाढ होत आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये मंकीपॉक्सची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. (Monkeypox Outbreak In Europe, US Raises Concern In India: How Govt Is Monitoring Situation)

अयोध्येतला ट्रॅप, सेना, राणा, अफजल खानाची कबर ते थेट अरे तू कोण आहेस, अंगावर आंदोलनाची एक केस तरी आहे का?; राज ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सतर्क झालं आहे. केंद्र सरकारनं हे प्रकरण गांभीर्यानं घेत आंतरराष्ट्रीय विमानतळं (International Airport), बंदर आणि देशाच्या सीमाभागांत (Ports and Border areas) लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. अशातच, आफ्रिकेतून (Africa) येणाऱ्या ज्या प्रवाशांमध्ये लक्षणं दिसून येतील. त्यांचे नमुने पुढील तपासणीसाठी पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (National Institute of Virology NIV) येथे पाठवले जातील.

दुःखद! बिहारमध्ये वीज पडून 33 जणांचा मृत्यू

एका वरिष्ठ अधिकार्‍यानं ANI ला सांगितलं की, एनआयव्ही, पुणे (Pune) येथे फक्त अशाच रुग्णांचे नमुने पाठवण्यात येणार आहेत, ज्यांच्यात काही लक्षणं आढळून येतील. ANI कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारनं नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (National Center for Disease Control (NCDC) आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (Indian Council of Medical Research (ICMR) यांना युरोप आणि इतरत्र ताज्या परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवण्यास सांगितलं आहे. दरम्यान, भारतात मंकीपॉक्सचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही.

ब्रिटेनमध्ये कोरोना पाठोपाठ मंकीपॉक्सचा वाढता प्रादुर्भाव

ब्रिटनच्या आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सध्या देशात एकूण 20 रुग्णांना मंकीपॉक्सची लागण झाली आहे. फक्त एका इंग्लंड (England) शहरात मंकीपॉक्सचे 11 रुग्ण आढळले आहेत. ब्रिटन सरकारनं शुक्रवारी (दि. 20) यासंदर्भात माहिती देताना, मंकीपॉक्सचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता. या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी फायदेशीर ठरणारी लस मिळवण्यासाठी सरकारकडून जोमाने प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. मंकीपॉक्स हा देवी रोगासारखाच आजार आहे.

मंकीपॉक्सची लक्षणं काय? (What are the symptoms of monkeypox?)

तज्ज्ञांच्या मते ‘मंकीपॉक्स’ हा एक दुर्मिळ विषाणू आहे. ताप आलेल्या व्यक्तीमध्ये जे सामान्य लक्षणे दिसतात, तीच लक्षणे यात दिसून आली आहेत. यामध्ये संक्रमित व्यक्तीच्या संपूर्ण शरीरावर आणि चेहऱ्यावर पुरळ (acne) दिसू लागते. याशिवाय ताप (Fever), स्नायू दुखणे (Muscle aches), डोकेदुखी (Headaches), थंडी वाजून येणे आणि थकवा अशी लक्षणे दिसू शकतात.

कसा वाढतो संसर्गाचा धोका? (How does the risk of Monkeypox infection increase?)

संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांना या विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. हा विषाणू त्वचा, श्वसनमार्गातून किंवा डोळे, नाक आणि तोंडातून आपल्या शरीरात प्रवेश करू शकतो. तसेच, संक्रमित प्राणी देखील या विषाणूचे सक्रिय वाहक असू शकतात. अशा प्राण्याच्या संपर्कात आल्याने, किंवा विषाणू-दूषित वस्तूंद्वारे देखील ‘मंकीपॉक्स’ पसरू शकतो.

मोदी सरकारचा महागाईवर सर्जिकल स्ट्राईक; पेट्रोल 9.50 रुपयांनी तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त

मंकीपॉक्सची लक्षणं काय? (What are the symptoms of Monkeypox?)

तज्ज्ञांच्या मते ‘मंकीपॉक्स’ हा एक दुर्मिळ विषाणू आहे. ताप आलेल्या व्यक्तीमध्ये जे सामान्य लक्षणे दिसतात, तीच लक्षणे यात दिसून आली आहेत. यामध्ये संक्रमित व्यक्तीच्या संपूर्ण शरीरावर आणि चेहऱ्यावर पुरळ (Acne) दिसू लागते. याशिवाय ताप (Fever), स्नायू दुखणे (Muscle Aches), डोकेदुखी (Headaches), थंडी वाजून येणे आणि थकवा अशी लक्षणे दिसू शकतात.

See also  प्रतीक्षा संपली! KTM RC 390 चे नवीन मॉडेल लाँच; जाणून घ्या किंमत, फिचर्स अन् बरचं काही

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?

See also  Trekking Accident : दगडाने केला घात; १२० फूट खोल दरीत कोसळून दोघा ट्रेकर्सचा मृत्यू, १२ जण सुखरूप

Share on Social Sites