Damini App : आता पंधरा मिनिटेआधी कळणार, वीज कुठे पडणार, ‘दामिनी अ‍ॅप’ देणार अलर्ट

आता पंधरा मिनिटेआधी कळणार, वीज कुठे पडणार, ‘दामिनी अ‍ॅप’ देणार अलर्ट l Damini App will Alert 15 minutes before Lightning in bad Weather
आता पंधरा मिनिटेआधी कळणार, वीज कुठे पडणार, ‘दामिनी अ‍ॅप’ देणार अलर्ट l Damini App will Alert 15 minutes before Lightning in bad Weather
Share on Social Sites

मुंबई l Mumbai (ई खबरबात न्युज नेटवर्क) :

दरवर्षी विज पडून होणाऱ्या मृत्यूंची संख्या हजारोंच्या घरात आहे. तसेच या नैसर्गिक आपत्तीमुळे (Natural Disaster) इतर होणारे नुकसान देखील मोठे आहे. जून (June), जुलै (July) आणि त्यानंतर सप्टेंबर (September), ऑक्टोबरमध्ये (October) वीज पडून होणारे मृत्यू टाळण्यासाठी आता ‘दामिनी अ‍ॅप’ सरसावले आहे. वीज पडण्यापूर्वी पंधरा मिनिटे अगोदर या अ‍ॅपकडून अलर्ट केले जाणार आहे. (Damini App will alert for Lightning Damini App developed for early warning and alerting of Thunderstorms)

भारत सरकारच्या पृथ्वी मंत्रालयाच्या वतीने (Ministry of Earth, Government of India) हे अ‍ॅप तयार करण्यात आले असून गुगल प्ले स्टोअरवर (Damini App Google Play Store) ते आहे. सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून सर्व शासकीय यंत्रणा (Government System), अधिकारी (Officers), कर्मचारी (Employees), नागरिक (Citizens), मंडल अधिकारी (Divisional Officers), महसूल विभाग (Revenue Department), सरपंच (Sarpanch), पोलीस पाटील (Police Patil), तलाठी (Talathi), ग्रामसेवक (Gramsevak), कृषिसेवक (Krishisevak), कोतवाल (Kotwal), आशा वर्कर्स (Asha Workers), अंगणवाडी सेविका (Anganwadi worker), आरोग्यसेवक (Health worker) अशा सर्वांसाठी हे अ‍ॅप विशेष महत्त्वाचे आहे.

हे अ‍ॅप ‘जीपीएस’ लोकेशनने (GPS location) काम करणार असून, वीज पडण्याच्या पंधरा मिनिटे अगोदर या अ‍ॅपमध्ये सभोवताली कुठे वीज पडण्याची शक्यता आहे, याबाबत निर्देश मिळणार आहेत. या अलर्टनुसार प्रशासकीय अधिकार्‍यांनी संबंधित ठिकाणी पूर्वसूचना दिल्यास नागरिकांना संकटाची कल्पना येईल आणि जीवितहानी टाळता येईल. वीज ज्या ठिकाणी पडणार त्या ठिकाणचे लोकेशन अ‍ॅपवर दाखविले जाईल. 20 ते 40 कि. मी. चा परिसर दाखविला जाईल.

याशिवाय अ‍ॅपवर ‘बिजली की चेतावनी नहीं है’ (No Lighting Alert) किंवा ‘बिजली की चेतावनी है’ (Possible to Lighting Alert) यासारखे मेसेज दिले जाणार आहेत. प्रत्येक पाच मिनिटांनी याबाबत अपडेट माहिती मिळणार आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेला हे अ‍ॅप वापरण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत.

आपत्तीच्या काळामध्ये लोकांना त्यातून पूर्वसूचना मिळेल आणि भविष्यातील संकट टाळता आले नाही, तरी त्यापासून होणारी जीवित व वित्तहानी वाचविण्यासाठी हे अ‍ॅप महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

  • हे ॲप मोफत आहे. ते गुगल प्ले-स्टोअरवरून डाउनलोड केले जाऊ शकते.

  • शेतकऱ्यांना या ॲपमध्ये नोंदणी करून आपल्या ठिकाणाची माहिती द्यावी लागणार आहे.

  • स्थानानुसार, क्षेत्राच्या 20 कि.मी. त्रिज्येमध्ये वीज पडण्याचा इशारा दिला जाईल.

  • दामिनी ॲपच्या मदतीने लोकांना मोबाईल फोनवर वादळाबाबत अलर्ट मिळेल.

  • वीज कोसळण्याच्या 15 मिनिटे आधी ऑडिओ आणि एसएमएसद्वारे अलर्ट (SMS Alert) प्राप्त होतील.

  • ॲप 40 स्क्वेअर किलोमीटरच्या परिघात ढगांच्या गडगडाटाचा अचूक अंदाज देईल.

  • पृथ्वी मंत्रालयाने देशाच्या 48 भागांमध्ये 48 सेन्सर्ससह ‘लाइटिंग लोकेशन नेटवर्क’ (Lightning Location Network) स्थापित केले आहे.

  • हे नेटवर्क वीज आणि गडगडाटाच्या वेगाची अचूक माहिती देते.

See also  अखेर राज ठाकरेंवर 'या' कलमान्वये गुन्हा दाखल; गृहमंत्र्यांच्या बैठकीनंतर अटक होणार?

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?

See also  अनिल परब ED च्या जाळ्यात; 'या' 7 ठिकाणी छापेमारी

Share on Social Sites